आरमोरी,
armori-turns-into-a-city-of-ice-once-again आरमोरीच्या मोटर स्टॅन्ड येथील नवदुर्गा उत्सव मंडळाच्यावतीने यावर्षी नवरात्र उत्सवातील भव्य धार्मिक देखाव्यासाठी व संपूर्ण विदर्भात आगळीवेगळी ओळख निर्माण करणारा हा मंडळ यावर्षी अमरनाथच्या पवित्र भूमीचा अनुभव देण्याचा संकल्प केला असून यापूर्वी सुद्धा अमरनाथची पवित्र गुफा आणि बाबा बर्फानीचा देखावा साकारण्यात येत आहे.
अमरनाथ गुहेतील बाबा बर्फानी शिवलिंगाचा भव्य देखावा उभारण्यात येत असून त्यासोबतच उत्तराखंडमधील प्रसिद्ध धारीदेवी मंदिराची प्रतिकृती साकारली जात आहे. सुमारे आठ हजार चौरस फूट परिसरात 40 फूट उंचीचा दोन मजली देखावा उभारला जात आहे. प्रवेशद्वाराजवळ भगवान शिव शंकराचे वाहन नंदीचे दर्शन घेतल्यानंतर भाविक गुहेच्या मार्गाने पुढे जातील. त्यानंतर धारीदेवी मातेचे दर्शन, अमरनाथ गुफेचा अनुभव आणि पुढे बर्फातून साकारण्यात आलेले बाबा बर्फानी शिवलिंगाचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. या धार्मिक प्रवासाच्या अखेरीस मातेचे दर्शन होणार आहे. त्यामुळे एका ठिकाणी विविध तीर्थक्षेत्राचा अनुभव देणारा हा देखावा भाविकांसाठी विषय आकर्षण ठरणार आहे.
उत्तराखंड मधील अलकनंदा नदीच्या काठावर वसलेल्या प्रसिद्ध धारीदेवी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत असून, गढवाल भागातील या शक्ती स्थळाला भाविकांमध्ये विशेष श्रद्धास्थान मानले जाते. याच धारिदेवी मंदिरातून पवित्र ज्योत आरमोरीत आणण्याचा संकल्प मंडळांनी केला आहे. त्यासाठी मंडळाचे पदाधिकारी 6 ऑक्टोबर रोजी उत्तराखंडकडे रवाना झालेले आहेत व ते 11 ऑक्टोबरला सकाळी आठ वाजता घटस्थापनेच्या दिवशी ती दिव्य ज्योत घेऊन आरमोरी येथे येणार आहेत.
मंदिराचे काम हे अंतिम टप्प्यात आले असून हिंगणघाट येथील वास्तू विशारद हरिदास पेंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोलकत्ता येथील कारागीर व दहा ते पंधरा मजूर यासाठी परिश्रम घेत आहेत. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी सुद्धा बाबा बर्फानी अमरनाथची पवित्र गुफा हा विशेष देखावा नवदुर्गा उत्सव मंडळ मोटर स्टॅन्ड यांनी निर्माण केलेला होता आणि त्यावेळेस सुद्धा मोठी जत्रा निर्माण झालेली होती आणि यामधूनच हे नवदुर्गा उत्सव मंडळ मोटर स्टॅन्ड प्रसिद्धीच्या झोतात आले आणि संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्रात या मंडळाचा नवरात्र उत्सव प्रसिद्ध आहे.