नेहरू-गांधी घराण्याच्या नावाने भाजयुमोकडून 'पिंडदान' आंदोलन

नागपुरात अनोख्या आंदोलनाने वेधले लक्ष

    दिनांक :10-Oct-2026
Total Views |
नागपूर

bjp काँग्रेसच्या नेहरू-गांधी कुटुंबातील पुढील पिढीला सद्बुद्धी लाभावी आणि दिवंगत नेत्यांच्या पितृदोषाचे निवारण व्हावे, या उद्देशाने भारतीय जनता युवा मोर्चातर्फे (भाजयुमो) शनिवारी नागपुरात अनोखे आंदोलन करण्यात आले. सीताबर्डी येथील गजबजलेल्या व्हरायटी चौकात पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या नावाने विधिवत पितृतर्पण व पिंडदान करण्यात आले.
 

nagpur news, bjp yuva morcha, bjym nagpur, pind daan protest, nehru gandhi family, jawaharlal nehru, indira gandhi, rajiv gandhi, variety chowk nagpur, congress vs bjp, maharashtra political news, nagpur political news, sachin karare, prashansa bhoyar, political controversy 
भाजयुमो नागपूर महानगरचे अध्यक्ष सचिन करारे आणि युवती प्रमुख प्रशंसा भोयर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम पार पडला. चौकात धार्मिक विधीच्या माध्यमातून हे तर्पण करण्यात आले."गांधी कुटुंबातील दिवंगत नेत्यांच्या नावाने पितृदोष शांती व्हावी आणि सध्याच्या पिढीला देशाच्या हितासाठी सद्बुद्धी मिळावी, या भावनेतून हे आयोजन करण्यात आले," अशी भूमिका आयोजकांनी यावेळी मांडली.
सार्वजनिक चौकात विरोधी पक्षातील दिवंगत राष्ट्रीय नेत्यांच्या नावाने थेट पिंडदान आणि तर्पण विधी केल्यामुळे या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमामुळे शहरातील राजकीय वर्तुळात नवा वाद पेटण्याची आणि काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.