वडिलांना लाकडी दांडयाने मारहाण

व्यसनाधीन मुलाचे कृत्य

    दिनांक :10-Oct-2026
Total Views |
मालेगाव,
father-beaten-with-a-wooden-club मालेगाव शहरात भाकर मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका मुलाने आपल्या ५५ वर्षीय वडिलांना लाकडी दांडयाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत वडिलांच्या डोयाला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला. जखमी वडिलांना उपचारासाठी प्रथम ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृतीची तपासणी केल्यानंतर डॉटरांनी त्यांना पुढील उपचारासाठी वाशीम येथे पाठविले. या प्रकरणी वडिलांनी मालेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
 
 
father-beaten-with-a-wooden-club
 
शिवाजी सखाराम शितोळे वय ५५, राहणार नरहरी मंदिराजवळ, मालेगाव असे जखमी वडिलांचे नाव आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, त्यांचा लहान मुलगा विलास शिवाजी शितोळे वय ३० याला दारूचे व्यसन असून, तो वारंवार वडिलांसोबत वाद घालून मारहाण करीत असल्याचा आरोप आहे. ८ ऑटोबर रोजी रात्री सुमारे ७ वाजता शिवाजी शितोळे घरी असताना त्यांनी लहान मुलगा विलास याच्याकडे भाकर मागितली. त्यावेळी विलासने अपमानास्पद बोलून भाकर देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी मोठा मुलगा साईनाथ वय ३५ याच्याकडे भाकर मागितली. साईनाथने भाकर दिल्यानंतर शिवाजी शितोळे जेवण करीत असताना विलास लाकडी काठी घेऊन आला. विलासने वडिलांच्या डोयावर, उजव्या हातावर तसेच डाव्या पायाच्या गुडघ्याखाली काठीने मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या डोयाला दुखापत होऊन रक्तस्राव झाला. यावेळी पत्नी शोभा शिवाजी शितोळे हिनेही शिवीगाळ करून लहान मुलाला मारहाण करण्यास सांगितल्याचा आरोप शिवाजी शितोळे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
 
 
घटनेनंतर शिवाजी शितोळे तक्रार देण्यासाठी मालेगाव पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथील डॉटरांनी तपासणीनंतर पुढील उपचारासाठी वाशीम येथे पाठविले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात येऊन आपला जबाब नोंदविला.फिर्यादीवरून मालेगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार राजेश खेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल किशोर चिंचोळकर करीत आहेत.