राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग

चालक-वाहक प्रसंगावधान राखून बचावले; महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

    दिनांक :10-Oct-2026
Total Views |
राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग
चालक-वाहक प्रसंगावधान राखून बचावले; महामार्गावरील वाहतूक विस्कळीत
अकोला
 बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर बोरगाव मंजूजवळ अकोल्याकडून अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या खाद्यतेल वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रकला शनिवार १० रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने ट्रक व त्यातील साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, चालकाच्या लक्षात हा प्रकार येताच त्याने प्रसंगावधान राखून ट्रक बाहेर उडी घेतली.त्यामुळे वाहक व त्याचा जीव वाचला.
 

fire
घटनेची माहिती वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख योगेश विजयकर यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील वानखडे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर हेडकॉन्स्टेबल महादेव पातोंड, नारायण शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.दरम्यान, बचाव व मदतकार्यासाठी वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे सदस्य शुभम कातखेडे आणि धनंजय देशमुख घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावर ट्रकला लागलेल्या भीषण आगीमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला.मालवाहू ट्रकला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.पुढील तपास ठाणेदार सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत.