नागपूर,
Nagpur University Hindi Department संशोधन ही ज्ञानाच्या विस्ताराची गुरुकिल्ली असून, मानवी गरजांची पूर्तता करण्यासाठी संशोधन महत्त्वाचे माध्यम आहे, असे प्रतिपादन इंग्रजी साहित्याचे अभ्यासक प्रा. संजय पलवेकर यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागात आयोजित द्विदिवसीय संशोधन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संशोधनामुळे ज्ञानाची प्रासंगिकता आणि मौलिकता सिद्ध होते, असेही त्यांनी सांगितले.हिंदी विभागप्रमुख डॉ. मनोज पांडेय यांनी संशोधन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याचे सांगितले. कार्यशाळेच्या विविध सत्रांत डॉ. सुमित सिंह, डॉ. लखेश्वर चंद्रवंशी आणि डॉ. मनोज पांडेय यांनी संशोधन विषयाची निवड, साहित्य संकलन, वर्गीकरण, परिकल्पना आणि संदर्भ यांवर मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. जागृती सिंह, प्रा. अर्चना द्विवेदी, संशोधक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सौजन्य:डॉ. लखेश्वर चंद्रवंशी,संपर्क मित्र