धरती हादरली तीव्रतेच्या भूकंपाने हाहाकार

    दिनांक :10-Oct-2026
Total Views |
पनामा सिटी
panama earthquake दक्षिण पनामामध्ये शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यांनी मोठी खळबळ उडाली. ७.७ आणि ६.६ रिश्टर स्केलच्या दोन शक्तिशाली भूकंपांनंतर ४५ हून अधिक आफ्टरशॉक्सची नोंद झाली. सलग धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी घराबाहेर धाव घेत सुरक्षित ठिकाण गाठले. भूकंपामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. काही रस्त्यांवर मोठ्या भेगा पडल्या आहेत. दरम्यान, भूकंपानंतर जारी करण्यात आलेला सुनामीचा इशारा आता मागे घेण्यात आला आहे.
 

panama earthquake  
अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार (USGS), सर्वाधिक तीव्रतेचा ७.७ रिश्टर स्केलचा भूकंप हेर्रेरा प्रांतातील पितालोसा अरिबा या दुर्गम भागापासून सुमारे १० किलोमीटर नैऋत्य दिशेला झाला. जमिनीखाली सुमारे १० किलोमीटर खोलीवर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. त्यानंतर ६.६ तीव्रतेचा आणखी एक शक्तिशाली भूकंप झाला. या धक्क्यांनंतर ५.८, ५.५ आणि ५.२ तीव्रतेचे अनेक आफ्टरशॉक्स जाणवले.
पनामा विद्यापीठातील भूकंपशास्त्रज्ञांनी आतापर्यंत ४५ हून अधिक आफ्टरशॉक्सची नोंद केली आहे. यातील अनेक धक्के अत्यंत कमी तीव्रतेचे असल्याने ते नागरिकांना जाणवले नाहीत. मात्र, सुरुवातीच्या शक्तिशाली धक्क्यांमुळे दक्षिण पनामातील अनेक भागांमध्ये नागरिकांमध्ये घबराट पसरली.
भूकंपाच्या धक्क्यांमुळे विविध ठिकाणी इमारतींचे नुकसान झाले असून रस्त्यांवर मोठ्या भेगा पडल्याचे समोर आले आहे. मात्र, अद्याप या भूकंपात कोणाचाही मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पनामाचे राष्ट्राध्यक्ष जोसे राउल मुलिनो यांनीही आतापर्यंत कोणत्याही मृत्यूची माहिती प्रशासनाला मिळालेली नसल्याचे सांगितले. भूकंपग्रस्त भागांमध्ये नुकसानीचे सर्वेक्षण सुरू असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पनामाच्या  panama earthquake  राष्ट्रीय नागरी संरक्षण सेवेचे अधिकारी ओमार स्मिथ यांनी टेलिमेट्रो रिपोर्टा या वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, वेरागुआस, हेर्रेरा आणि लॉस सॅंटोस या प्रांतांमध्ये भूकंपाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. राजधानी पनामा सिटीमध्ये मात्र कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, लॉस सॅंटोस प्रांतातील ऐतिहासिक सॅन अतानासियो चर्च कोसळले आहे. या चर्चला १९३८ मध्ये राष्ट्रीय ऐतिहासिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले होते. वेरागुआस प्रांतात अनेक रस्त्यांवर लांब आणि खोल भेगा पडल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, ४ ऑक्टोबर रोजी इंडोनेशियातही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. त्या वेळी भूकंपाची तीव्रता ५.२ रिश्टर स्केल इतकी