नागपूर,
Public Awareness About Cleanliness राजनगर परिसरातील अस्वच्छतेच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ‘अस्मिता मंडळा’तर्फे गुरुवारी स्वच्छता जनजागृती पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. रस्त्यांवर साचणारा कचरा, वापरलेले सॅनिटरी पॅड, डायपर्स आणि अन्य कचऱ्यामुळे होणाऱ्या अस्वच्छतेबाबत नागरिकांना जागरूक करण्यात आले.
सुचिता अय्यर, कांचन कानेटकर, रश्मी पाठक, अंजुषा खराबे आणि श्रुती सदावर्ते यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. स्वच्छता राखणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पथनाट्यातून करण्यात आले. उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सौजन्य ;राजेंद्र मरस्कोल्हे,संपर्क मित्र