मानोरा,
manora-taluka राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मानोरा तालुयातील सन २०२५-३० करीता ७७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण ९ ऑटोबर रोजी तहसील कार्यालय, मानोरा येथे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजेंद्र पाटील यांच्या वतीने सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले.या आरक्षण सोडतीसाठी तालुयातील अनेक नागरिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, माजी सरपंच व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुयात एकूण ७७ ग्रामपंचायती असून त्यापैकीअनुसूचित जाती - ५, अनु. जाती महिला - ५, अनु. जमाती - ६, अनु. जमाती महिला - ५, नागरिकांचा मागास प्रवर्ग - ८, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - ९, सर्वसाधारण - १९ व सर्वसाधारण महिला - २० अशा जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती - वापटा, सोयजना, आसोला खु., हिवरा बु., भुली, अनुसूचित जाती महिला - पारवा, फुलउमरी, वाईगौळ, पाळोदी, ढोणी, अनुसूचित जमाती - दापुरा बु., सिंगडोह, हातना, माहुली, उमरा बु., गोंडेगाव, अनुसूचित जमाती महिला - कुपटा, सोमनाथनगर, खापरदरी, मेंद्रा, पोहरादेवी, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) - हिवरा बु., कोंडोली, वटफळ, एकलारा, रूद्राळा, रोहणा, तळप बु., अभईखेडा, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - रतनवाडी, गिर्डा, सेवादासनगर, शेंदोना, सावळी, कारपा, आमदरी, कार्ली, कोलार, सर्वसाधारण - अजनी, दापुरा खु., भोंईनी, चौसाळा, चोंढी, धामणी, बोरव्हा, कारखेडा, वरोली, सोमठाना, साखरडोह, गोस्ता, रुई, उमरी खु., धावंडा, तोरनाळा, देवठाणा, आमगव्हाण, खांबाळा, सर्वसाधारण महिला - इंझोरी, जामदरा (घोटी), म्हसणी, मोहगव्हाण, जनुना खु., आसोला बु., देवुरवाडी, पंचाळा, गादेगाव, गव्हा, विठोली, गिरोली, भिंलडोंगर, शेंदुर्जना, सोमेश्वरनगर, वसंतनगर (पोहरादेवी), आमकीन्ही धानोरा बु., हळदा, हातोली. या आरक्षण सोडतीनंतर तालुयातील राजकीय हालचालींना वेग आला असून अनेक इच्छुकांनी आपापल्या गावातील आरक्षणानुसार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.