जया बच्चन यांच्या समर्थनार्थ तनिषा मुखर्जी मैदानात

पापाराझींना स्पष्ट शब्दांत सुनावले

    दिनांक :10-Oct-2026
Total Views |
मुंबई  
jaya bachchan अभिनेत्री काजोलची बहीण आणि अभिनेत्री तनिषा मुखर्जी सध्या चित्रपटसृष्टीत फारशी सक्रिय नसली, तरी विविध कारणांमुळे ती चर्चेत असते. आता ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतल्यामुळे तनिषा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जया बच्चन आणि पापाराझी यांच्यात सार्वजनिक ठिकाणी अनेकदा वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नुकतेच एका पत्रकाराचा माईक बाजूला सारल्याच्या घटनेनंतर जया बच्चन चर्चेत आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर तनिषाने त्यांची बाजू घेत पापाराझींच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
 

jaya bachchan 
तनिषाच्या म्हणण्यानुसार, काही पापाराझी जया बच्चन यांना मुद्दाम त्रास देतात आणि त्यांना प्रतिक्रिया देण्यास प्रवृत्त करतात. दुर्गापूजेच्या काळात जया बच्चन यांच्याशी आदराने वागावे आणि त्यांना त्रास होईल, असे वर्तन टाळावे, असे आवाहन तनिषाने केले आहे. दुर्गापूजेशी संबंधित एका कार्यक्रमात बोलताना तिने पापाराझींच्या वागण्याबद्दलची नाराजी व्यक्त केली.
तनिषाने केवळ जया बच्चन यांच्याच नव्हे, तर दुर्गापूजेसाठी येणाऱ्या सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही उपस्थित केला. दुर्गापूजेच्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात. अशा वेळी एकमेकांना धक्काबुक्की करणे किंवा इतरांना त्रास होईल, असे वर्तन करणे टाळावे, असे तिने सांगितले. गर्दीत प्रत्येकाने एकमेकांची काळजी घ्यावी आणि सर्वांशी माणुसकीने वागावे, असे आवाहनही तिने केले.
तनिषाच्या मते, काही jaya bachchan  पत्रकार विनाकारण जया बच्चन यांच्या भोवती गर्दी करतात आणि त्यांना बोलण्यास प्रवृत्त करतात. अशा प्रकारचे वर्तन दुर्गापूजेच्या आयोजनादरम्यान होऊ नये, असे तिने स्पष्ट केले. सणाच्या काळात सेलिब्रिटींसह सर्व नागरिकांना सुरक्षित आणि सन्मानपूर्वक वातावरण मिळणे महत्त्वाचे असल्याची भूमिका तिच्या वक्तव्यातून दिसून आली.मुंबईत जया बच्चन, काजोल, तनिषा मुखर्जी आणि राणी मुखर्जी यांच्या कुटुंबीयांकडून दुर्गापूजेचे आयोजन उत्साहात केले जाते. या उत्सवात मोठ्या संख्येने नागरिक आणि माध्यमांचे प्रतिनिधी सहभागी होतात. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन आणि सेलिब्रिटींच्या खासगी अवकाशाचा आदर राखणे, हे मुद्देही चर्चेत आले आहेत.
तनिषा मुखर्जीने २००३ मध्ये ‘श्श्श…’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मात्र, तिला चित्रपटसृष्टीत अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतरही ती विविध कार्यक्रमांमधील उपस्थिती आणि वक्तव्यांमुळे चर्चेत राहिली आहे. आता जया बच्चन यांच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्यामुळे तनिषा पुन्हा एकदा मनोरंजनविश्वातील चर्चेचा विषय ठरली आहे.