१८ ऑक्टोबरला योगासन स्पर्धा

७० वर्षांपर्यंतच्या स्पर्धकांना संधी; विजेत्यांना पदके व चषक

    दिनांक :10-Oct-2026
Total Views |
नागपूर,
Yoga Asana Competition ‘योगदर्शनम् – द सर्च ऑफ इनर सोल’च्या वतीने द्वितीय खुली राज्यस्तरीय योगासन स्पर्धा १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रेशीमबाग चौकातील जैन कलार समाज भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.

kali 
 
 
गुरुदेव बहुउद्देशीय संस्था, जैन कलार समाज सेवा समिती ‘प्रयास’, जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ आणि क्रीडा भारती यांच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेत ५ ते ७० वर्षे वयोगटांतील महिला व पुरुषांना सहभागी होता येईल. विविध वयोगटांनुसार स्पर्धा होणार असून विजेत्यांना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके देण्यात येतील. तसेच मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्रपणे ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ चषक प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र व सहभाग पदक दिले जाईल.स्पर्धेचे प्रवेश शुल्क ४०० रुपये असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख १२ ऑक्टोबर आहे. प्रत्येक स्पर्धकाला पाच योगासने सादर करावी लागतील. अधिकाधिक शाळा, महाविद्यालये, योगसंस्था, योगशिक्षक आणि नागरिकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन ‘योगदर्शनम्’च्या संचालिका डॉ. वर्षा मासुरकर यांनी केले आहे.
सौजन्य:डॉ. वर्षा मासुरकर,संपर्क मित्र