कापसाला नुसता हिरवा अन् पिवळा पाला!

काही ठिकाणी मोजकेच बोंडं

    दिनांक :11-Oct-2026
Total Views |
समुद्रपूर,

cotton crop जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा ३० टक्के कमी पाऊस आणि आता उष्ण वातावरणामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसाचा खंड आणि वाढत्या उन्हामुळे कापूस पीक कोमेजू लागले असून उत्पादनाची आशा जवळपास मावळली आहे. मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले तर कमी पडलेल्या पावसामुळे पीक करपत चालले आहे. दरम्यान, तालुक्यातील काही भागातील शेतात प्रती झाडं कापसाचे ५ बोंडं दिसत असून अख्ख्या शिवारात हिरवा अन् पिवळा पाला नजरेस पडत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च तरी निघेल का, असा प्रश्न उभा ठाकला आहे.
 

cotton crop crisis in samudrapur: 30% less rainfall leaves farmers worried over yield 
किरकोळ पावसाच्या भरवशावर कापूस पिकाने सप्टेंबरपर्यंत कशीबशी तग धरली. मात्र, ऑक्टोबरमध्ये पावसाने पाठ फिरवल्यानंतर उन्हाच्या झळांनी पिकाची अवस्था बिकट झाली आहे. फुलांची मोठ्या प्रमाणात गळ होत असून बोंडधारणा अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. अनेक शेतांमध्ये कापसाला सरासरी चार ते पाचच बोंडं लागलेली आहेत. एकरी किमान एक क्विंटल कापूस हाती येईल की नाही याचीही शाश्वती राहिलेली नाही. उत्पादन तर दूरच केलेला मशागत, बियाणे, खतं, औषध फवारणी आणि मजुरीचा खर्च तरी निघेल का, याची चिंता शेतकर्यांना सतावत आहे. दुष्काळ, पावसाचा खंड आणि सध्या पिकाची झालेली ही अवस्था पाहता यंदाचा कापूस हंगाम शेतकर्यांसाठी मोठे आर्थिक संकट घेऊन येणारा ठरणार आहे.
शासनाने कापूस पिकाचे पंचनामे cotton crop करून शेतकर्यांना हेक्टरी विशेष दुष्काळी अनुदान व पीक विमा रक्कम नुकसानभरपाई द्यावी. यासाठी निधी अपुरा पडत असेल तर शासनाने विकास कामाला स्थगिती द्यावी. ज्या शेतकर्यांनी पीक विमा काढला त्यांना विना अटीशर्तीवर १०० टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. धर्मेंद्र राऊत यांनी केली आहे.