मुंबई
kranti redkar मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री क्रांती रेडकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या चर्चेत येण्यामागे कारण ठरले आहे ते २०१३ सालचे आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण. या वादात क्रांती रेडकरचे नाव समोर आल्यानंतर त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती. क्रिकेटपटू एस. श्रीसंत याच्याशी तिचे नाव जोडून काही वृत्त प्रसिद्ध झाली होती. मात्र, या जुन्या प्रकरणाबाबत आता क्रांतीने पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चुकीच्या व्यक्तीशी झालेल्या नावाच्या गोंधळामुळे आपले नाव या प्रकरणाशी जोडले गेले आणि त्याचा आपल्याला तसेच कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागला, असे तिने सांगितले.
२०१३ मध्ये इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलदरम्यान स्पॉट फिक्सिंगचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात क्रिकेटपटू एस. श्रीसंत याच्यासह काही खेळाडूंची नावे चर्चेत आली होती. प्रकरणाची व्याप्ती वाढत असताना काही माध्यमांच्या वृत्तांमध्ये क्रांती रेडकरचे नावही समोर आले. तिचा श्रीसंतशी संबंध असल्याचा आणि तिने त्याची भेट घेतल्याचा दावा काही वृत्तांमधून करण्यात आला होता. मात्र, क्रांतीने त्यावेळीच या दाव्यांचे खंडन केले होते. या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगतानाच चुकीच्या व्यक्तीशी झालेल्या नावाच्या गोंधळामुळे आपल्याला या वादात ओढण्यात आल्याचे तिने स्पष्ट केले होते.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत क्रांतीने त्या काळातील परिस्थितीचा अनुभव सांगितला. २०१३ मध्ये तिचे नाव स्पॉट फिक्सिंग प्रकरणाशी जोडले गेले, त्यावेळी ती कोकणातील कुडाळ येथे ‘काकण’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होती. विशेष म्हणजे, ‘काकण’मधून ती दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत होती. एकीकडे ती चित्रपटाच्या कामात व्यस्त असताना दुसरीकडे मुंबईत तिच्याबाबत विविध बातम्या प्रसारित होत होत्या.
आजच्या काळात सोशल मीडिया हे कलाकारांसाठी आपली बाजू थेट आणि तातडीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम ठरले आहे. मात्र, २०१३ मध्ये सोशल मीडिया आणि इंटरनेटचा वापर सध्याइतका सहज आणि व्यापक नव्हता. त्यामुळे एखादी बातमी समोर आल्यानंतर त्यावर तात्काळ स्पष्टीकरण देणे किंवा आपण नेमके कुठे आहोत, प्रत्यक्षात काय घडले आहे, हे लोकांपर्यंत पोहोचवणे सोपे नव्हते. याच परिस्थितीमुळे आपली बाजू मांडताना अनेक अडचणी आल्याचे क्रांतीने सांगितले.
या प्रकरणाचा परिणाम केवळ क्रांतीपुरता मर्यादित राहिला नाही, तर तिच्या कुटुंबालाही त्याचा मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे या प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्याऐवजी तिने कायदेशीर मार्गाने लढण्याचा निर्णय घेत