श्री कामाक्षा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्य भव्य धार्मिक कार्यक्रम

    दिनांक :11-Oct-2026
Total Views |
कारंजा लाड,
shri kamaksha devi कारंजा नगरीचे आराध्य दैवत व कारंजेकरांची कुलस्वामिनी ऐतिहासिक शक्तीपीठ असलेल्या श्री कामाक्षा देवी च्या शारदीय नवरात्र उत्सवाला ११ ऑक्टोंबर २०२६ पासून प्रारंभ झाला असून श्री नवरात्र उत्सवात दरवर्षीप्रमाणे पारंपारिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 

shri kamaksha devi sharadiya navratri 2026 begins in karanja lad with grand religious programs 
या आदिशक्ती श्री कामाक्षा देवीचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण भारतात श्री कामाक्षा देवीचे दोनच ठिकाणी शक्तीपीठ आहेत त्यातील एक म्हणजे आसाम राज्यातील गोहाटी व दुसरे म्हणजे विदर्भ राज्याच्या वाशीम जिल्ह्यातील पवित्र शक्तीपीठ कारंजा नगरी होय. श्री कामाक्षा माता ही नवसाला पावणारी मनोकामना पूर्ण करणारी जागृत देऊन ओळखले जाते ही जगन माता कारंजा नगरीचे संस्थापक श्री करंजऋषी यांच्या काळातील एक मात्र आद्य दैवत असून, मातेच्या दर्शनार्थ हिंदवी स्वराज संस्थापक राजे छत्रपती शिवराय दर्शनार्थ आल्याचे पुरातन इतिहास आहे सध्या स्थिती या मंदिराचा कारभार महाजन कुटुंबियाकडे आहे.
 
 
श्री कामाक्षा माता संस्थान कारंजाचा शारदीय श्री नवरात्र उत्सव म्हणजे मातृशक्ती उपासका करिता आनंदाची पर्वणी असते त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर आजूबाजूच्या प्रांतातूनही येथे भाविक भक्त येत असतात. नवरात्र निमित्त ११ ऑक्टोंबर रोजी श्रीदेवीचा मंगल अभिषेक व घटस्थापना. रात्री ७.३० वाजता माऊली गुरु यांचा कार्यक्रम नंतर ०९ वाजता मुरलीधर भजनी मंडळ यांचा कार्यक्रम पार पडला. shri kamaksha devi  १२ ऑक्टोबरला स्वरांजली महिला भजनी मंडळ सकाळी ९ ते १२ व दुपारी दीपस्तंभ महिला भजनी मंडळ ३ ते संध्याकाळी ६ व रात्री नऊ ते बारा वनेश्वर महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम राहील. १३ ऑक्टोबरला सकाळी ९ ते १२ सरस्वती भजनी मंडळ लोकमान्य नगर, दुपारी ३ ते ६ शारदा माता महिला भजनी मंडळ शिक्षक कॉलनी व रात्री साडेसात वाजता नेहा संजय किटे यांचा कराओके भक्तिसंगित कार्यक्रम. १४ ऑक्टोबरला दुपारी एक ते तीन सुकन्या महिला भजनी मंडळ शिक्षक कॉलनी नंतर चार ते सहा नागनाथ महिला भजनी मंडळ व रात्री नऊ ते बारा अष्टविनायक गुरुदेव भजनी मंडळ यांचा कार्यक्रम. १५ ऑक्टोबरला सकाळी ९ ते १२ गुरुमाऊली भजनी मंडळ बाबरे कॉलनी, दुपारी तीन ते सहा संतोषी माता गजानन महिला मंडळ सहारा कॉलनी व रात्री साडेसातला रुक्मिणी महिला भजनी मंडळ लोकमान्य नगर. १६ ऑक्टोबरला दुपारी ३ ते ६ शारदा महिला भजनी मंडळ मारवाडीपुरा व रात्री साडेसात वाजता षष्ठी असल्यामुळे श्री कामाक्षा माता गोंधळी कला संच कडोळे परिवार यांचा जोगवा चा कार्यक्रम व नंतर रात्री आठ ते दहा श्रीराम महिला भजनी मंडळ गायकवाड नगर यांचा भजन होईल. १७ ऑक्टोबरला दुपारी साडेबारा वाजता गुरु गजानन महाराज महिला भजनी मंडळ सुंदर वाटिका व दुपारी तीन ते सहा श्री गजानन महाराज महिला भजनी मंडळ महावीर कॉलनी. १८ ऑक्टोबरला अष्टमी असल्यामुळे दुपारी २ ते ५ दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्र यांचे सप्तशती पाठ राहील व रात्री ९ वाजता होम हवनाला सुरुवात होईल होमाची आरती रात्री १२ वाजता होईल व त्यानंतर दीपमाळ प्रज्वलन करण्यात येईल. १९ ऑक्टोबरला रात्री ७.३० वाजता अर्चना तोमर यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम होणार आहे. २० ऑक्टोबरला विजयादशमी निमित्त सकाळी महाभिषेक व दुपारी देवीचा शृंगार व सिमोलंग्न होईल तसेच नवरात्र उत्सवात दररोज महाआरतीची वेळ दुपारी बारा वाजता आणि रात्री सात वाजता आरती होणार आहे.
नवरात्र उत्सवात भक्तांची दर्शनासाठी मांदियाळी असते नवरात्रउत्सानिमित्त नवरात्र संपल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन होत असते अशा मातृशक्ती पिठावर दूर दुरून भाविक दर्शनासाठी येतात मंदिरावर कळसाची रंगरंगोटी करण्यात आली आहे व लाइटिंग सजवण्यात आली आहे मंदिरामध्ये आकर्षक रांगोळ्या काढल्या जातात अत्यंत उत्साहात सोहळा संपन्न होत आहे भावीक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री कामाक्षा देवी संस्थान व भक्त मंडळी कडून करण्यात आले आहे.