बँकेत जाण्यापूर्वी लक्ष द्या! १२ ते १८ ऑक्टोबरचे सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर

    दिनांक :12-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
attention before going to the bank बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे करण्याचा विचार करत असाल, तर बँकेच्या सुट्ट्यांची माहिती आधीच जाणून घेणे आवश्यक आहे. १२ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत कोणत्या दिवशी बँका सुरू राहतील आणि कोणत्या दिवशी बंद असतील, याचे वेळापत्रक समोर आले आहे. दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबर सोमवार, १३ ऑक्टोबर मंगळवार, १४ ऑक्टोबर बुधवार, १५ ऑक्टोबर गुरुवार आणि १६ ऑक्टोबर शुक्रवार या पाचही दिवशी बँकांचे कामकाज सुरू राहणार आहे. तर १७ ऑक्टोबर शनिवार आणि १८ ऑक्टोबर रविवार या दोन दिवशी बँका बंद राहतील. १७ ऑक्टोबर रोजी त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे महासप्तमीच्या निमित्ताने बँकांना सुट्टी आहे, तर १८ ऑक्टोबरला रविवारच्या साप्ताहिक सुट्टीमुळे बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.
 
 

banks 
 
यानंतरच्या आठवड्यात म्हणजेच १९ ते २५ ऑक्टोबरदरम्यानही विविध सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी महाअष्टमीच्या निमित्ताने उत्तर प्रदेश, बिहार, त्रिपुरा, पश्चिम बंगाल यांसह काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील. २० ऑक्टोबरला दसऱ्यानिमित्त बँकांना सुट्टी असेल. तर २१ ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या निमित्ताने गंगटोक, कोलकाता, बेंगळुरू आणि आगरतळा येथे बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे या काळात बँकेतील कामांचे नियोजन करताना संबंधित राज्यातील सुट्ट्यांचे वेळापत्रक तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
याशिवाय २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी सिक्कीममध्ये दसरा आणि विजयादशमीशी संबंधित सुट्ट्यांमुळे बँकांचे कामकाज बंद राहणार असल्याचे दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे. २४ ऑक्टोबर हा महिन्यातील चौथा शनिवार असल्याने आणि २५ ऑक्टोबरला रविवार असल्याने बँका बंद राहतील. मात्र, बँकांच्या सुट्ट्या राज्य आणि स्थानिक सणांनुसार वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे प्रत्यक्ष बँकेत जाण्यापूर्वी आपल्या शहरातील किंवा संबंधित शाखेतील सुट्टीची अधिकृत माहिती तपासून घेणे आवश्यक आहे.