रंगमंचावरच बिघडली प्रकृती

लावणी सादर केल्यानंतर पक्षाघाताचा झटका, मधु कांबीकर यांचा संघर्षमय प्रवास अखेर थांबला

    दिनांक :12-Oct-2026
Total Views |
मुंबई
madhu kambikar death मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि प्रसिद्ध लावणी कलावंत मधु कांबीकर यांच्या निधनाने मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. आपल्या अभिनयाने आणि नृत्यकलेने अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मधु कांबीकर यांनी वयाच्या ७३व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळापासून आजाराशी झुंज देत असलेल्या कांबीकर यांच्या आयुष्यातील एका घटनेने त्यांच्या पुढील संपूर्ण आयुष्याची दिशा बदलली होती. लावणी सादर करत असतानाच त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यानंतर आलेल्या पक्षाघाताच्या झटक्यामुळे त्यांना कायमस्वरूपी कलेपासून दूर व्हावे लागले.
 

madhu kambikar, madhu kambikar death, marathi actress, lavani artist, lavani queen, madhu kambikar stroke, madhu kambikar paralysis, madhu kambikar illness, marathi cinema, marathi entertainment news, marathi actress death, madhu kambikar news, madhu kambikar biography, madhu kambikar films, lavanya sangeet, marathi celebrity news, veteran actress, marathi film industry, marathi breaking news 
२७ नोव्हेंबर २०१६ रोजी मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात ‘लावण्य संगीत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल १० ते १२ वर्षांनंतर मधु कांबीकर पुन्हा एकदा लावणी सादर करण्यासाठी रंगमंचावर उतरणार होत्या. या कार्यक्रमासाठी त्यांनी अनेक दिवस मेहनत घेतली होती. वयाची साठी ओलांडल्यानंतरही त्यांचा उत्साह आणि कलेप्रती असलेली निष्ठा तसूभरही कमी झाली नव्हती.
कार्यक्रमात त्यांनी दोन नृत्य सादर केली. त्यानंतर भैरवी सादर करण्यासाठी त्या रंगमंचावर आल्या. मात्र, नृत्य सुरू असतानाच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. प्रकृती साथ देत नसतानाही त्यांनी सादरीकरण अर्धवट सोडले नाही. जिद्दीने त्यांनी आपली भैरवी पूर्ण केली आणि त्यानंतर मेकअप रूममध्ये गेल्या.मात्र, मेकअप रूममध्ये पोहोचल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली. त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि उजवा हात बधीर झाला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एका डॉक्टरांनी त्यांना तातडीने प्राथमिक उपचार दिले. त्यानंतर त्यांना मुंबईतील परळ येथील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे समोर आले होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी उपचारांना प्रतिसाद दिल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली होती.
मात्र, या घटनेचा त्यांच्या पुढील आयुष्यावर मोठा परिणाम झाला. पक्षाघातानंतर त्यांच्या प्रकृतीच्या समस्या वाढत गेल्या. दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींसाठीही त्यांना कुटुंबीयांच्या मदतीची आवश्यकता भासू लागली. अखेर त्यांना अंथरुणाला खिळून राहावे लागले. आजारपणामुळे त्यांच्या अभिनय कारकिर्दीलाही पूर्णविराम मिळाला आणि लावणीसह आपल्या आवडत्या कलेपासून त्यांना कायमचे दूर व्हावे लागले.
मधु कांबीकर यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत मराठी चित्रपटसृष्टीला अनेक संस्मरणीय भूमिका दिल्या. ‘एक होता विदूषक’, ‘झपाटलेला’, ‘माझा छकुला’ आणि ‘बिनकामाचा नवरा’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. लावणी, लोकनाट्य आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून त्यांनी मराठी मनोरंजनविश्व समृद्ध केले. ठसकेबाज अदाकारी, प्रभावी अभिनय आणि लावणीतील खास शैली यामुळे त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.
एकेकाळी रंगमंचावर madhu kambikar death आपल्या कलेने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या ज्येष्ठ कलावंताच्या आयुष्यातील अखेरची अनेक वर्षे मात्र आजाराशी झुंज देण्यात गेली. रंगमंचावरून सुरू झालेला त्यांचा हा संघर्ष अखेर पुण्यातील त्यांच्या निधनाने थांबला. मधु कांबीकर यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीने केवळ एक अभिनेत्रीच नव्हे, तर लावणी आणि लोककलेशी आयुष्यभर निष्ठा जपणारी एक समर्थ कलावंत गमावली आहे.