बांडीया नदीत बुडून एकाचा मृत्यू

घटनास्थळी पंचनामा पूर्ण

    दिनांक :12-Oct-2026
Total Views |
एटापल्ली
man-drowns तालुक्यातील बांडीया नदीच्या पात्रात बुडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज, 12 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे. मासा पेंदा कूदयेटी असे बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
man drown
मिळालेल्या माहितीनुसार, मासा पेंदा कूदयेटी यांचा अचानक बांडीया नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणी नदीच्या किनार्‍यावर पोहचून घटनेची पाहणी करीत मौका चौकशी करून रीतसर पंचनामा केला.
 
पंचनाम्यादरम्यान ग्रामपंचायत अधिकारी संजय गेडाम, महसूल सेवक मोहन उसेंडी, संतोष चांदेकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस व संबंधित अधिकार्‍यांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मृतकाच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.