आर्वीत जगातील सातवे आश्चर्य श्री यंत्र मंदिरात नवरात्र उत्सव प्रारंभ

    दिनांक :12-Oct-2026
Total Views |
आर्वी
navratri येथील एका प्राध्यापक अवलीयाने आपल्याच स्वप्नातील मंदिराची उभारणी केली. श्री यंत्राच्या आकारातील जगातील हे सातवे मंदिर असल्याचा दावा केल्या जातो. अवघ्या ३ वर्षात चांदणीच्या आकारातील १२ भींती असलेले रेणुका माता मंदिरात नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला.
 
 
arvi
माजी नगराध्यक्ष प्रशांत सव्वलाखे यांनी मंदिराचा पाया रचला. सव्वालाखे यांनी मुलीचे नाव रेणुका ठेवले होते. अल्पवयात किरकोळ आजाराने निधन झाले. मुलीच्या स्मृतीत आणि रेणुकेच्या अपारश्रद्धेने त्यांनी या मंदिराची उभारणी केली. आर्वी येथे शेताच्या धुर्‍यावर एक छोटेसे देवीचे मंदिर होते. आज ते मंदिर स्थापत्यकलेचे अद्वितीय उदाहरण ठरते. प्राचीन श्रीयंत्राच्या प्रतिरूपात उभारलेले हे मंदिर चांदणीच्या आकारात व बारा भिंतींच्या भव्यतेत रेणुका मातेची आकर्षक मुर्तीची पुनर्रस्थापना करण्यात आली. पायर्‍यांपासुन ब्रह्मबिंदूपर्यंत मंदिर श्रीयंत्राच्या रचनेप्रमाणे आखले असून प्रत्येक भिंत अद्वितीय प्रतीकात्मक अर्थ घेऊन उभी आहे. बारा भिंती आकाशाकडे झेपावणार्‍या त्रिकोणी रेषांमध्ये बांधल्या गेल्या असून त्या शती, समृद्धी आणि संरक्षण यांचे द्योतक आहेत. मंदिराच्या मध्यभागी रेणुका मातेसाठी साकारलेला गाभारा शांतता व अध्यात्मिक उर्जेची अनुभूती देतो. श्री विद्या शास्त्रानुसार या मंदिराला १ प्रदक्षिणा पुर्ण केली तर २ हजार ९५२ देवींची आराधना होत असल्याचे सव्वालाखे यांनी सांगितले.
 
श्री यंत्र मंदिर श्री रेणुका देवी मंदिरात अश्विन नवरात्र उत्सवाला भतिभावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. यजमान शुभदा व प्रशांत सव्वालाखे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरात दररोज पहाटे रेणुका देवीची महापूजा, महावस्त्र व शृंगार, प्रातःकालीन आरती, दुपारी सामूहिक महिला भजन, शप्तशती पाठ, सायंकालीन आरती, प्रसाद वितरण यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
मंदिरात येणार्‍या भाविकांसाठी सुयोग्य दर्शन व्यवस्था व अन्य सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विश्वस्त प्रशांत सव्वालाखे यांचे सह पूर्ण वेळ निःस्वार्थ सेवा पुंडलिक अवथले, दैनंदिन पूजा प्रकाश व पुष्पा देऊळकर तसेच रेणुका देवीचा श्रृंगार वैभव देऊळकर करतात. भक्त मंडळाचे पुंडलिक अवथले, प्रकाश देऊळकर, सुधीर भांडे, सुरेश सरोदे, मोरेश्वर देशमुख, नंदू ईरावार, पंडित भोंगाडे, वैभव सव्वालाखे, ताराचंद नेहारे, अनिल मोरे, सूरज देऊळकर, बाळा कोंडलकर, गजानन कोंडलकर, प्रमोद कोंडलकर, नाना देशमुख, शुभदा सव्वालाखे, पुष्पा देऊळकर, प्रियंका सव्वालाखे, वैशाली भांडे, राधिका भारती, दर्शिका अरबट, पूजा मांडवकर, रंजना अरबट, वर्षा चोरे मंदिराच्या विकासाकरिता परिश्रम घेतात