१३ जणांचा मृत्यू, ३०९ जखमी, CCTV फुटेज समोर

    दिनांक :12-Oct-2026
Total Views |
रियाद

riyadh airport missile attack सौदी अरेबियाची राजधानी रियाद येथील किंग खालिद इंटरनॅशनल विमानतळावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला असून ३०९ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, विमानतळाच्या टर्मिनल परिसरात झालेल्या भीषण स्फोटाचा प्रभाव त्यात स्पष्टपणे दिसत आहे. सौदी अधिकाऱ्यांनी या हल्ल्यासाठी शेजारील येमेनमधील इराणसमर्थित हूती बंडखोरांना जबाबदार धरले आहे.
 
riyadh airport missile attack: 13 killed, 309 injured as CCTV footage emerges 
स्थानिक माध्यमांनी प्रसारित केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमानतळाच्या टर्मिनल कॉम्प्लेक्समध्ये मोठा स्फोट झाल्याचे दिसत आहे. हल्ल्यानंतरचे हे दृश्य सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहे. रियाद विमानतळावरील या घटनेमुळे इराणसोबत सुरू असलेल्या व्यापक तणावाच्या पार्श्वभूमीवर आखाती क्षेत्रातील विमान वाहतूक पायाभूत सुविधांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हा क्षेपणास्त्र हल्ला विमानतळाच्या टर्मिनल ३ आणि ४ असलेल्या कॉम्प्लेक्सवर झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन्ही टर्मिनलमधून देशांतर्गत विमानसेवा चालवली जाते. हल्ल्यामुळे विमानतळाच्या काही सुविधांचे नुकसान झाले असून, त्याची पाहणी आणि नुकसानीचे मूल्यांकन अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.
सौदी अरेबियाच्या जनरल अथॉरिटी ऑफ सिव्हिल एव्हिएशनने दिलेल्या माहितीनुसार, १० ऑक्टोबर रोजी झालेल्या या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार सौदी नागरिकांसह बांगलादेशच्या दोन नागरिकांचा समावेश आहे. तसेच अमेरिका, भारत, इजिप्त, जॉर्डन, सीरिया, पॅलेस्टाईन आणि सुदान या देशांतील प्रत्येकी एका नागरिकाचा मृतांमध्ये समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. जखमींना  riyadh airport missile attack उपचारासाठी विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे.एका प्रादेशिक अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, विमानतळाच्या टर्मिनल ३ आणि ४ परिसरात क्षेपणास्त्र आदळले. हल्ल्यानंतर विमानतळाच्या सुविधांचे नुकसान झाले असून, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रशासनाकडून तपासणी केली जात आहे. सौदी नेतृत्वाखालील आघाडीने या हल्ल्याचा निषेध करत तो ‘पूर्णपणे युद्धगुन्हा’ असल्याचे म्हटले आहे. तसेच या हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशाराही देण्यात आला आहे.हल्ल्यानंतर किंग खालिद इंटरनॅशनल विमानतळावरील विमानसेवा तात्पुरती थांबवण्यात आली.
 
 
 
सुरक्षेची पाहणी आणि नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी विमानतळाचा कारभार रोखण्यात आला होता. विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून प्रवेशद्वारेही बंद करण्यात आली आहेत.सुरक्षेची परिस्थिती लक्षात घेऊन विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. काही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी रियादसह सौदी अरेबियातील इतर विमानतळांसाठीच्या सेवांमध्ये यापूर्वीच बदल केले होते किंवा काही सेवा तात्पुरत्या स्थगित केल्या होत्या. या हल्ल्यानंतर आखाती प्रदेशातील विमानतळांच्या सुरक्षेचा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे.