जिपचे मुकाअ गुलाबराव खरात यांची बदली

मुंबईचे भालचंद्र चव्हाण घेणार पदभार

    दिनांक :12-Oct-2026
Total Views |
बुलढाणा
transfer आपल्या वैविध्यपूर्ण आणि प्रगतीपूरक उपक्रमांनी बुलढाणा जिल्हा परिषदेला संपूर्ण राज्यामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करून देणारे, संवेदनशील कलासक्त असणारे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन मंत्रालय मुंबईचे संचालक भालचंद्र चव्हाण साईओ म्हणून पदभार घेतील.
 
zp
गुलाबराव खरात यांनी बुलढाण्यात २ वर्ष २ महिने कार्यकाळ पूर्ण केला आहे. यादरम्यान त्यांनी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविले. त्यांना अद्याप पुढील नियुक्ती देण्यात आलेली नाही. तरी त्यांना योग्य ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळणार असल्याचे सूत्रांकडून कळते. गुलाबराव खरात यांच्या बदलीचे आदेश सुभाष उमराणीकर यांच्या स्वाक्षरीने जारी झाले आहे.