अकोल्यात २७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान २१ कुंडीय स्वाहाकार यज्ञ सोहळा

१६ कोटी ‘जय जगदंब’ नामजपाचा संकल्प

    दिनांक :13-Oct-2026
Total Views |
अकोला,
21-kundiya-swahakar-yagya-ceremony ब्रह्मलीन योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराजांच्या १०९ व्या जयंती महोत्सवानिमित्त शहरात १६ कोटी ‘जय जगदंब’ नामजपाचा संकल्प करण्यात आला आहे. या संकल्पांतर्गत ११ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत नामजप उपक्रम राबविण्यात येत असून, २७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान २१ कुंडीय स्वाहाकार यज्ञ सोहळ्याचे आयोजन केशव नगर स्थित मारोती मंदिर प्रांगण येथे करण्यात आले आहे.
 
 
21-kundiya-swahakar-yagya-ceremony
 
येथील जगदंब परिवाराच्या वतीने २१ कुंडीय स्वाहाकार यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, २६ नोव्हेंबरपासून कार्यक्रमांना सुरुवात होणार असून, सकाळी १० वाजता सर्व देवता व पीठस्थापना करण्यात येईल. सायंकाळी ५ वाजता शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यज्ञातील हवन प्रक्रिया पुढील तीन दिवस दररोज सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ अशा सत्रांत पार पडणार आहे. प्रत्येक सत्रात ८० यजमानांद्वारे यज्ञातील हवन संपन्न होणार आहे. शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हवन होईल. सायंकाळी ७ वाजता अंबरीश महाराज यांचे ‘नाममहिमा व नवविधा भक्ती’ या विषयावर प्रवचन होणार आहे.
 
 
या सोहळ्याला आप्पा महाराजांच्या सहधर्मचारिणी गिरिजामाता, अनिरुद्ध महाराज तसेच भागवताचार्या राजेश्वरी अंबरीश जोशी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या धार्मिक सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जगदंब परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत अण्णामहाराजांचा जन्मोत्सव सोहळा, सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हवन, तर सायंकाळी ७ ते ७.४५ या वेळेत अंबरीश महाराज यांचे ‘ सद्गुरू सेवा’ या विषयावर प्रवचन होईल. सायंकाळी ७.४५ ते ८.३० या वेळेत अण्णा महाराजांचे राजोपचार पूजन करण्यात येईल. रविवार, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत हवन, दुपारी ४.३० वाजता पूर्णाहुती व महाआरतीने सोहळ्याची सांगता होणार आहे. सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.