गडचिरोली,
chavadeshwari-temple शहरातील रामपुरी वॉर्डात लिंगायत देवांग समाजाच्या मातृदेवता श्री चवडेश्वरी मातेचे मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. यावेळी मंदिरात मुख्य घटस्थापनासोबतच वैयक्तिक भाविकांच्या घटांचीही स्थापना केली जाते. यावर्षी रविवारी 345 वैयक्तिक व प्रमुख घटस्थापना करण्यात आली आहे. या घटांवर लावलेल्या दिव्य प्रकाशाने चवडेश्वरी मंदिर उजळून निघाले आहे.
शक्ती उपासनेचा महान पर्व नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. नवरात्रीचे 9 दिवस भाविक माताराणीची पूजा करतात. गडचिरोली शहरातील लिंगायत देवांग समाजाचे पूजनीय चवडेश्वरी माता मंदिर आहे. शहरातील सर्वात जुने देवी मंदिर असल्याने नवरात्रोत्सवात भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. श्री चवडेश्वरी माता मंदिरात 11 ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. मुख्य घटस्थापनाबरोबरच वैयक्तिक घटस्थापनाही मंदिरात होते. त्यामुळे यंदा चावडेश्वरी मंदिरात 345 भाविकांनी घटस्थापना केली आहे. या घटांवर लावलेल्या दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाले आहे. घटस्थापनेच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
घटस्थापनेची परंपरा कायम
नवरात्रोत्सवात अनेक भाविकांना घटस्थापना करण्याची इच्छा असते. परंतु काही कारणांमुळे अनेकांना घटस्थापना करता येत नाही. त्यामुळे चवडेश्वरी माता मंदिरात वैयक्तिक घट स्थापनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वैयक्तिक घटस्थापनेची परंपरा येथे अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात अनेक भाविक मंदिरात घटस्थापना करतात. मागील वर्षी 332 घटांची स्थापना करण्यात आली होती. यावर्षी यामध्ये वाढ होऊन 345 घटांची स्थापना करण्यात आली़.