चंद्रपूर
chandrapur police चंद्रपूर शहर पोलिस ठाण्याच्या वतीने डिजे चालक व आयोजक यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, या कारवाईत बोलेरो पिकअप वाहनासह डिजेचे साहित्य असा एकूण 9 लाख 66 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी चंद्रपूर शहर पोलिस ठाणे येथे अपराध क्रमांक 1025/2026, महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील कलम 223, 38 व 136 अन्वये 12 ऑक्टोबर रोजी पहाटे 2.23 वाजता डिजे चालक व आयोजक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान वाहन क्रमांक एमएच 34, बीजी 0516 असलेले बोलेरो पिकअप वाहन तसेच डिजेचे साहित्य असा एकूण 9 लाख 66 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चंद्रपूर शहर पोलिस ठाण्याच्या वतीने कायद्याचे उल्लंघन करणार्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.