पत्नीचे अश्लील फोटो सोशल मिडियावर व्हायरल

पतीसह त्याच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल

    दिनांक :13-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,

viral obscene photos अनैतिक संबंध ठेवणाऱ्या पतीने पत्नीसोबतच्या अंतरंगाचे फोटो आणि पत्नीचे अश्लील फोटो काढले. ते सर्व फोटो आपल्या प्रेयसीला पाठवले. ते फोटो सोशल मिडियावर आणि काही नातेवाईकांना पाठवून महिलेचा विनयभंग करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणी ३५ वर्षीय पती आणि त्याच्या प्रेयसीवर पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
 

husband and girlfriend booked for viral obscene photos of wife in nagpur 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ३० वर्षांची आहे. लग्न झाल्यानंतर पती लैंगिक विकृतपणे वागत होता. तिच्याशी शारीरिक संबंध ठेवताना तो वारंवार फोटो आणि व्हिडिओ काढत होता. असे कृत्य करण्यास मनाई केल्यास पत्नीला मारहाण करीत होता. त्यामुळे पत्नी घाबरुन त्याच्या या कृत्याला सहकार्य करीत होती. त्याने पत्नीची अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ काढले आणि ते आपल्या प्रेयसीला व्हॉट्सअपवर पाठवले. त्यानंतर संबंधित प्रेयसीने स्वतःच्या मोबाईलवरून फोटो आणि व्हिडिओ तक्रारदार महिलेच्या नातेवाइकांना पाठवले. तसेच सोशल मीडियावर तिने व्हायरल केले. या प्रकारामुळे महिलेची कुटुंबीयांमध्ये बदनामी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर पीडित महिलेने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज सादर करून दोघांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. या अर्जाची चौकशी केल्यानंतर पाचपावली पोलिसांनी पती आणि त्याच्या प्रेयसीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला. खासगी छायाचित्रे संमतीशिवाय प्रसारित करणे आणि बदनामी केल्याच्या आरोपांचा या प्रकरणात समावेश आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.