मुंबई
kapus konda marathi movie सत्यघटनेपासून प्रेरणा घेतलेल्या ‘कापूसकोंडा’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. कुत्र्याला घाबरणाऱ्या एका निवृत्त कर्मचाऱ्याच्या आयुष्यात एका कुत्र्याच्या आगमनानंतर घडणाऱ्या अनपेक्षित घटनांभोवती या चित्रपटाचे कथानक गुंफण्यात आले आहे. ‘अ फॅमिली डॉग फिल्म’ अशी टॅगलाइन असलेल्या या चित्रपटातून कौटुंबिक नातेसंबंध, मानवी भावभावना आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचे वेगळे चित्र प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा चित्रपट २३ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या टीझरला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता ट्रेलरमधून कथानकाची अधिक झलक दाखवण्यात आली आहे. एका निवृत्त कर्मचाऱ्याला भेट म्हणून मिळालेला कुत्रा आणि त्यांच्यात निर्माण होणारे नाते हा कथेचा केंद्रबिंदू आहे. या नव्या सदस्याच्या आगमनामुळे कुटुंबात कोणत्या घडामोडी घडतात, नात्यांमधील समीकरणे कशी बदलतात आणि त्यातून कोणती रहस्ये अथवा कारस्थाने समोर येतात, याची उत्सुकता ट्रेलरमुळे वाढली आहे. कुटुंबातील कोणाचे स्थान टिकणार आणि कोणाला दूर जावे लागणार, याविषयीचे प्रश्नही चित्रपटाच्या कथेबद्दल कुतूहल निर्माण करतात.पॅनोरामा स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती जास्वंद एंटरटेन्मेंट्स प्रा. लि. यांनी केली आहे. व्हीपी माऊली ग्रुप ऑफ कंपनीज आणि स्टोरीवाला फिल्म यांच्या सहकार्याने हा चित्रपट सादर करण्यात येत आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांनी केले असून, पटकथा आणि संवादलेखनाची जबाबदारी सचिन मोहिते, गणेश पंडित आणि ऋषिकेश तुरई यांनी सांभाळली आहे. सचिन पाटेकर यांनी छायांकन केले आहे. संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी चित्रपटातील गाण्यांना संगीत दिले असून, अभिजीत हे