मुंबईनं मोडला 11 वर्षांचा रेकॉर्ड तर कोकण 'हिट'

    दिनांक :13-Oct-2026
Total Views |
मुंबई
Konkan Heatwave ऑक्टोबर महिना सुरू होताच पावसाचा जोर ओसरून हवेत गारवा जाणवू लागतो, अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा असते. मात्र, यंदा कोकणातील हवामानाने वेगळेच रूप धारण केले आहे. मुंबईसह कोकणातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला असून, काही ठिकाणी तो ३९ अंशांच्या आसपास पोहोचला आहे. रत्नागिरीमध्ये १२ ऑक्टोबर रोजी कमाल तापमानाची नोंद ३९.२ अंश सेल्सिअस इतकी झाली. ऑक्टोबर महिन्यातील तापमानाच्या नोंदींमध्ये हा गेल्या १४३ वर्षांतील उच्चांक असल्याचे वृत्त समोर आल्याने हवामानातील या बदलाची चर्चा सुरू झाली आहे. ऑक्टोबरमध्येच मे महिन्यासारख्या उन्हाच्या झळा बसत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
 
 

Konkan Heatwave Ratnagiri Records 39.2°C in October, 143-Year Record Reported
रत्नागिरीतील तापमानवाढीबरोबरच ठाणे आणि मुंबईतही उष्णतेची तीव्रता जाणवत आहे. ठाण्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले, तर मुंबईत पारा ३८.२ अंशांपर्यंत पोहोचला. मुंबईतील तापमान सरासरीपेक्षा तब्बल ५.१ अंशांनी अधिक असल्याचे वृत्त आहे. ऑक्टोबरच्या मध्यावरच तापमानात झालेल्या या वाढीमुळे पावसाळ्यानंतर वातावरणात अपेक्षित असलेला गारवा अद्याप जाणवत नसल्याचे चित्र आहे.
मोसमी पावसाने माघार घेतल्यानंतर उकाडा कमी होईल, अशी आशा नागरिकांना होती. प्रत्यक्षात मात्र वाढत्या तापमानामुळे उन्हाचा चटका अधिक तीव्र झाला आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईसह कोकणातील अनेक भागांमध्ये उष्ण Konkan Heatwave  आणि दमट हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वगळता कोकणातील अन्य भागांसाठी उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आल्याचे वृत्त आहे. अरबी समुद्राकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे गेल्या ४८ तासांत हवामानाच्या स्थितीत बदल झाल्याचेही सांगण्यात येत आहे.दरम्यान, महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात उकाडा वाढलेला असताना उत्तर भारतातील काही भागांमध्ये गारपीट आणि प्रतिकूल हवामानाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातही तापमानवाढीमुळे उन्हाचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात राज्याच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या हवामानस्थितीचा अनुभव नागरिकांना येत आहे.यंदाच्या हवामानातील बदलांच्या पार्श्वभूमीवर एल निनोच्या संभाव्य प्रभावाचीही चर्चा सुरू आहे. नोव्हेंबरमध्ये एल निनोची स्थिती कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, डिसेंबरच्या अखेरीस त्य