मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला २0 वर्षांची शिक्षा

    दिनांक :13-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर
nagpur court अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयवंत यादव यांनी २० वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपए दंड, अशी शिक्षा ठोठावली. छबिराम गुरुराम देवांगन (३९, रा. मोहरेंगा, ता. बेमेतरा, छत्तीसगढ , ह. मु. बिडगाव, नंदनवन, नागपूर ) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
 

nagpur court sentences man to 20 years in prison for sexually assaulting minor girl 
५ ऑक्टोबर २0१७ रोजी नंदनवन हद्दीत राहणाऱ्या महिलाच्या तीन वर्षीय मुलीला पाणी आणण्याच्या बहाण्याने नेऊन तिच्यासोबत आरोपीने लैंगिक अतिप्रसंग केला. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला होता. आरोपीला १७ आॅक्टोबर २0१८ रोजी अटक करण्यात आली होती. तत्कालीन तपास अधिकारी चव्हाण यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. साक्षी पुराव्याअंती गुन्हा सिध्द झाल्याने आरोपीला कलम ६ पोक्सो कायद्यान्वये २0 वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरीक्त सश्रम कारावास तसेच भादंविच्या कलम ३७६ (२)(१) मध्ये २0 वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ वर्ष अतिरीक्त सश्रम कारावास, अशी शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून अल्का ढेंगरे, अमोल कोठीया यांनी न्यायालयाला सहकार्य केले. सरकारतर्फे अ‍ॅड. दीपिका गवळी यांनी बाजू मांडली.