कारंजा लाड,
mahur-devi महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कारंजा आगाराच्या वतीने भाविकांसाठी श्री माहूरदेवी दर्शनाची विशेष माहूरगड पॅकेज दूर आयोजित करण्यात येत आहे. ११ ऑटोबर ते २० ऑटोबर या कालावधीत ४० प्रवासी उपलब्ध झाल्यास ही विशेष पॅकेज दूर आयोजित करण्यात येणार असून, कारंजा शहर व परिसरातील भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
माहूरगड हे महाराष्ट्रातील भाविकांचे या श्रद्धास्थान असून, श्री माहूरदेवीच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक जात असतात. भाविकांना सुरक्षित, आरामदायी आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळावा, या उद्देशाने कारंजा आगाराने ही विशेष पॅकेज दूर सुरू केली आहे. प्रवासादरम्यान एसटीचे सवलतीचे तिकीट लागू राहणार असल्याने भाविकांना आर्थिकदृष्ट्यालाही दिलासा मिळणार आहे. या पॅकेज दूरच्या माध्यमातून भाविकांना एसटीच्या आरामदायी प्रवासाचा लाभ घेत माहूरगड येथे श्री माहूरदेवीचे पवित्र दर्शन घेता येणार आहे. ४० प्रवाशांची संख्या पूर्ण झाल्यानंतर पॅकेज टूरचे नियोजन करण्यात येणार असल्याने इच्छुक भाविकांनी लवकरात लवकर आगाऊ आरक्षण करून आपला सहभाग निश्चित करावा, असे आवाहन कारंजा आगार व्यवस्थापक हेमंत चंदूरकर यांनी केले आहे.