मुंबई,
anil-ambanis-assets-worth-2032-crore-attached-by-ed देशातील नामवंत उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या अडचणी कमी होताना दिसून येत नाहीत. गेल्या वर्षभरापासून त्यांच्या संपत्तीवर ईडीकडून कारवाई सुरू आहे. आत्तापर्यंत 9 हजार कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यातच, रिलायन्स पॉवर लिमिटेडची भारतातील 2,032.81 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त करण्यात आली आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (FEMA) कलम 37A अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. जप्त मालमत्तेत रिलायन्स (Reliance) पॉवरच्या बँक खात्यातील रक्कम आणि सासन पॉवर लिमिटेडमधील भागीदारीचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

अनिल अंबानी यांनी परदेशात बेकायदेशीररीत्या ठेवलेल्या परकीय चलनाच्या सममूल्याची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. SEBI कडून मिळालेल्या माहितीनंतर ED चा अधिक तपास सुरू आहे. कंपनीच्या खात्यांमध्ये 2,101.46 कोटींच्या राइट-ऑफ आणि तरतुदींची नोंद केली आहे. ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स आणि केमन आयलंड्समधील कंपन्यांतील परदेशी गुंतवणूक आणि ॲडव्हान्सच्या व्यवहारांची चौकशी. तसेच, 2006 मध्ये रिलायन्स नॅचरल रिसोर्सेस लिमिटेडने परकीय चलन परिवर्तनीय रोख्यांद्वारे 300 दशलक्ष डॉलर उभारले आहेत. त्यापैकी 275 दशलक्ष डॉलर सिंगापूरस्थित उपकंपनीत गुंतवण्यात आल्याचा आरोप आहे. या निधीच्या आधारे BVI मधील कंपन्यांना कर्ज देण्यात आले. या कंपन्यांचे नियंत्रण भारतातून रिलायन्सच्या अनिल अंबानी समूहाकडून होत असल्याचा आरोप असल्याने ED कडून तपास सुरू आहे.
दरम्यान,मॉरिशसमधील परदेशी संस्थांमार्फत निधी भारतात तात्पुरता परत आणल्याचा आणि उर्वरित निधी परदेशात ठेवल्याचा आरोप करण्यात आला असून कर्जाची परतफेड न झाल्यानंतर व्यवहार वैध व्यावसायिक असल्याचे भासवण्यासाठी मागील तारखेची कागदपत्रेही त्यांनी तयार केल्याचे तपासात उघडकीस
आले.
यापूर्वी 9000 कोटींची संपत्ती जप्त
दरम्यान, यापूर्वी देखील अनिल अंबानी यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांची मोठी संपत्ती जप्त केली आहे. त्यामुळे, अनिल अंबानी यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढतच असल्याचे दिसून येते. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपवर ईडीकडून नोव्हेंबर 2025 मध्ये कारवाई करण्यात आली होती. तेव्हा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं रिलायन्स ग्रुपशी संबंधित 1400 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. यापूर्वीच ईडीने अनिल अंबानी यांची एकूण 9000 कोटींपेक्षा जास्त रुपयांची संपत्ती जप्त केली आहे