मोठी बातमी! ‘CJP ला अमेरिकेतून निधी पुरवला जातोय’

अमेरिकन गायिकेचा खळबळजनक दावा

    दिनांक :14-Oct-2026
Total Views |
न्यूयॉर्क
cjp funding us प्रसिद्ध अमेरिकन गायिका मेरी मिलबन यांनी कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि अभिजीत दिपके यांच्याविरोधात अत्यंत गंभीर आरोप केला आहे. अभिजीत दिपके आणि त्यांच्या CJP पक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला विरोध करण्यासाठी अमेरिकेतील काही निवडक देणगीदारांकडून मोठ्या प्रमाणावर निधी पुरवला जात असल्याचा दावा मिलबन यांनी केला आहे. याआधीही CJP च्या फंडिंगबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित झाले होते, परंतु आता एका आंतरराष्ट्रीय गायिकेने उघडपणे भाष्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

cjp singer

‘विघटनकारी शक्ती भारताच्या विकासाला लक्ष्य करत आहेत’
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर एक सविस्तर पोस्ट शेअर करत मेरी मिलबन यांनी भारताच्या तरुण पिढीला उद्देशून आपले विचार मांडले. त्यांनी लिहिले की, ‘माझ्या तरुण देशभक्तांनो, तुमचे पंतप्रधान सलग 3 वेळा निवडून येत गेल्या 25 वर्षांपासून भारताची सेवा करत आहेत आणि माझ्या देशातील विघटनकारी शक्तींपुढे ते कधीही झुकणार नाहीत.’ पुढे बोलताना त्यांनी असा दावा केला की, जागतिक पातळीवरील हे देणगीदार जगभरातील पुराणमतवादी नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या तरुणांना हेरतात, त्यांना कट्टरपंथी बनवून त्यांच्याच देशात अनागोंदी पसरवण्यासाठी वापरतात.'

भारतीय तरुणांनी CJP च्या विरोधात एकत्र येण्याचे मिलबन यांचे आवाहन
भारताच्या लोकशाहीचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आता एका नव्या प्रति-चळवळीची नितांत गरज असल्याचे मिलबन यांनी म्हटले आहे. भारताच्या मातीत जन्मलेला, वाढलेला आणि तिथेच शिक्षण घेतलेला एक खरा आवाज पुढे येऊन CJP च्या या विघटनकारी आंदोलनाचा शांततापूर्ण मार्गाने विरोध करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे देशातील तरुण पिढीने पुढे येऊन याविरुद्ध आपला आवाज बुलंद करावा, असे आवाहन त्यांनी भारतीय तरुणांना केले आहे.