पिकांवर झालेल्या परिणामांचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करा: विभागीय आयुक्त नयना गुंडे

    दिनांक :14-Oct-2026
Total Views |
वाशीम,
divisional-commissioner-naina-gunde दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांवर झालेल्या परिणामांचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून पीक परिस्थितीची अचूक आणि सुस्पष्ट माहिती संकलित करावी, असे निर्देश अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी आज येथे दिले. विभागीय आयुक्तांनी मंगळवार १४ ऑटोबर रोजी वाशीम जिल्ह्यातील विविध तालुयांना भेट देऊन शेतातील सोयाबीन, कापूस आणि हळद चिया आदी पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये कारंजा तालुयातील खेर्डा, मंगरूळनाथ तालुयातील घोटा आणि वाशीम तालुयातील सूपखेला येथील शेतशिवारांचा समावेश होता.
 
 
divisional-commissioner
 
या पाहणी दौर्‍यास जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार निलेश पळसकर, तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे आदींची उपस्थिती होती. पाहणी दौर्‍यादरम्यान विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी स्थानिक शेतकरी बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधला. दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे पिकांचे झालेले नुकसान, पाण्याची उपलब्धता आणि पीक वाढीवर झालेला परिणाम याविषयी त्यांनी शेतकर्‍यांकडून थेट माहिती जाणून घेतली.
 
 
या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीतील पीक परिस्थिती, पावसाची तूट आणि प्रशासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या उपायांची सविस्तर माहिती विभागीय आयुक्तांना दिली. यावेळी संबंधित मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहायक आणि ग्रामपंचायत अधिकारीही उपस्थित होते.