जिल्हा बँकेवर पहिल्यादांच महायुतीचा भगवा

तालुका गटात नऊ व जिल्हा गटातील सात जागांवर विजय

    दिनांक :14-Oct-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
 
यवतमाळ,
district-bank जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात कायम दबदबा राखणाèया काँग्रेस व समर्थित पक्षांची जिल्हा बँक निवडणुकीत मोठी पीछेहाट झाली. महायुतीने एकूण 25 पैकी 16 जागी विजय मिळवून या बँकेवर पहिल्यांदाच भगवा फडकवला आहे. यात शिवसेनेने महायुतीतील सर्वाधिक सात जागांवर विजय मिळवला आहे. तर युतीतील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला पाच जागा मिळाल्या आहेत. भाजपानेही चार जागांवर विजय मिळवत सहकारात प्रवेश केला आहे. याउलट महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा पक्ष ठरला असून त्यांनी नऊपैकी सात जागा घेतल्या आहेत. दोन जागांवर उबाठा सेनेला विजय मिळाला आहे.
 
 
महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यापूर्वी राजकीय तडजोडीतून भाजपाचे अमन गावंडे यांना जिल्हा बँकेत अध्यक्ष बनण्याची संधी मिळाली होती. मात्र तेव्हा बहुमत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे होते. त्यानंतर बँकेत सलग काँग्रेस आघाडीचीच सत्ता राहिली आहे. यंदा बदललेल्या राजकीय समीकरणानुसार सहकारातील दिग्गजांनी आपला गड कायम राखला आहे.
 
 
उमरखेड तालुका गटात मात्र माजी आमदार प्रकाश देवसरकर यांना मोठा धक्का बसला, समान मते मिळाल्याने झालेल्या ईश्वरचिठ्ठीत त्यांचा पराभव झाला. तसेच बँकेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकात गाडे यांचा यवतमाळ तालुका गटात पराभव झाला. पालकमंत्री संजय राठोड यांनी राखीव गटातील ओबीसी जागा प्रतिष्ठेची केली होती. येथे मात्र मविआकडून राहुल माणिकराव ठाकरे यांनी विजय प्राप्त केला. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांची उमेदवारी प्रतिष्ठेची केली होती. मात्र तेथे मविआचे बंडखोर उबाठा समर्थित सुनील कातकडे यांनी विजय प्राप्त केला. वणी तालुका निवडणूक तिहेरी झाल्याने आघाडीचा उमेदवार तिसèया क्रमांकावर गेला.
 
जिल्हा गट विजयी उमेदवार
नानाभाऊ गाडबैले - महायुती
राजुदास जाधव - महायुती
विराज घुईखेडकर - महायुती
देविदास चवरे - महायुती
 
राखीव गट विजयी उमेदवार
राहुल ठाकरे - मविआ
स्वाती येंडे - मविआ
स्मिता कदम - महायुती
महेश राठोड - महायुती
मिलिंद मानकर - महायुती
 
तालुका गट विजयी उमेदवार
खा. संजय देशमुख - महायुती
विजय जाधव - महायुती
अमन गावंडे - महायुती
कौस्तुभ शिर्के - महायुती
प्रवीण देशमुख - महायुती
स्नेहल भाकरे - महायुती
किरण देरकर - मविआ
तृप्ती पाटील - मविआ
सुशील राठोड - महायुती
नितीन भुतडा - महायुती
राम देवसरकर - मविआ
जितेंद्र कोंघारेकर - मविआ
सुनील कातकडे - अपक्ष
राजू येल्टीवार - मविआ
डॉ. अरविंद भुरे - मविआ
प्रवीण कोकाटे - महायुती