दूष्काळात ‘समाधाना’ची साठवण, गाेसेखूर्द भरले १०० टक्के

धरणाची पातळी २४५.५०० मीटरवर, जलसाठा ४०.४

    दिनांक :14-Oct-2026
Total Views |
९ टीएमसीवर, धरणाची सर्व द्वारे बंद

भंडारा

gosikhurd dam विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, धरणातील जलसाठा १०० टक्क्यांवर पोहोचला आहे. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी धरणाच्या पाण्याने २४५.५०० मीटर इतकी पातळी गाठली असून धरणात ४०.४९ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. एकीकडे दूष्काळीचे काळे ढग दिसत असताना पूर्ण क्षमतेने भरलेले धरण समाधानाची साठवणूक करणारा आहे. पूर्व विदर्भातील ६ जिल्हयांना हा जलसाठा संजीवनी ठरणार आहे.
 

gosikhurd dam reaches 100% capacity with 40.49 tmc water storage 
कमी पडलेला पाउस, काेरडे पडलेले नदी, नाले आणि तळ गाठलेली पाण्याची पातळी अशा भयान परिस्थितीत सध्या आपण आहाेत. आज जे अवस्था आहे, त्यावरुन भविष्यात पाण्याचे माेठे संकट येणार हे स्पष्ट आहे. परिणामी शासनाकडून आतापासून जलसंकटावर मात करण्यासाठी पाण्याचे नियाेजन करण्याचे सुचना काटेकाेरपणे पाळण्यात येत आहे. अनेक प्रकल्पांचा जलसाठा मृतावस्थेत पाेहचला असताना, गाेसेखूर्द प्रकल्पाने मात्र आशेचा किरण दाखविला आहे.
 
 
१३ ऑक्टाेबर राेजी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. धरणाची पूर्ण संचय पातळी २४५.५०० मीटर असून, सध्याची पाणी पातळीही तेवढीच आहे. धरणातील एकूण जलसाठा १,१४६.०७५ दशलक्ष घनमीटर (एमसीएम) इतका नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे धरण १०० टक्के भरले असल्याचे स्पष्ट झाले आहे. धरणाच्या सर्व द्वारांना बंद ठेवण्यात आले असून, अतिरिक्त येणारे पाणी कालव्याच्या वाटे साेडण्यात येत आहे. ६० घनमीटर प्रति सेकंद वेगाने हे पाणी सोडले जात आहे. यामध्ये उजव्या मुख्य कालव्याद्वारे ६० घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर डाव्या मुख्य कालव्याद्वारे पाणी सोडणे बंद आहे.
धरणाच्या जलविद्यूत gosikhurd dam केंद्रातून ४० घनमीटर प्रति सेकंद, तर उजव्या कालव्यावरील जलविद्युत केंद्रातून ५० घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग नोंदविण्यात आला आहे. नदीपात्रातील एकूण विसर्ग ४० घनमीटर प्रतिसेकंद अर्थात १,४१३ क्युसेक इतका आहे. १ जून २०२६ पासून १३ ऑक्टोबर पर्यंत गोसेखुर्द धरणात एकूण ७,२७८.७४५ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे. याच कालावधीत ६,७९३.९६८ दशलक्ष घनमीटर पाण्याचा बाहेर विसर्ग नोंदविण्यात आला आहे. चालू पावसाळ्यात आतापर्यंत एकूण ५६०.४० मिमी पाऊस नोंदविण्यात आला आहे.
गोसेखुर्द धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सिंचन आणि जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने या जलसाठ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी प्रयाेगीत तत्वावर २०२२ मध्ये आणि एकदा २०२६ मध्ये धरण पूर्ण भरले हाेते. मात्र त्यावेळी पाणी साेडण्यात आले. परंतु यावेळी भविष्यातील पाणी संकट पाहता पाण्याची पातळी कायम ठेवण्यात येईल, असे गाेसेखूर्द व्यवस्थापनाकडून सांगितले जात असून सिंचनासाठी गरज पडल्यास तसे नियाेजन केली जाईल, असेही सांगण्यात येत आहे.
...