कारंजा,
karanja-tahsil-drought-listराज्यातील खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट आणि इतर घटकांचा विचार करून राज्यातील ३०५ तालुके अंतिम दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले आहेत. यामध्ये कारंजा तालुक्याचा देखील ’ट्रिगर-१’ मध्ये समावेश करण्यात आला. तांत्रिक अडचणींमुळे कारंजा तालुक्याचा समावेश नव्हता. त्यामुळे शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, शेतकर्यांच्या न्याय्य मागणीसाठी आ. सुमित वानखेडे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे कारंजा (घा.) तालुक्याचाही दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश झाला. त्यामुळे वर्धा जिल्हाच आता दुष्काळग्रस्त झाला आहे.
कारंजा (घा.) तालुक्याचा दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश नसल्याने विरोधकांनी त्याचा राजकीय फायदा घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, त्या टीका-टिप्पणी आणि कथित नरेटिव्हला न जुमानता, आ. सुमित वानखेडे यांनी प्रशासनावर मजबूत पकड असल्याचे पुन्हा सिद्ध करून आपल्या मतदार संघातील कारंजा तालुक्याचा दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश करून विरोधकांचे तोंड चुप केली.
दुष्काळग्रस्तांच्या यादीत कारंजा तालुक्याचा समावेश झाल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये कृषी वीजजोडण्या खंडित न करणे, शेतकरी व शेतमजुरांसाठी अन्नधान्याची उपलब्धता सुनिश्चित करणे, जनावरांसाठी चार्याची योग्य व्यवस्था करणे आणि जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर हाती घेणे यांसारख्या महत्त्वाच्या उपाययोजना देखील प्रभावीपणे राबवल्या जाणार आहेत. कारंजा तालुक्याचा यादीत समावेश झाल्यामुळे आता येथील स्थानिक नागरिकांना व शेतकर्यांना या सर्व शासकीय सवलतींचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.