उत्तर प्रदेश
muskan and sahil उत्तर प्रदेशातील मेरठ येथे गाजलेल्या नीळ्या ड्रम हत्याकांडात आज, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला. मर्चंट नेव्हीचे माजी कर्मचारी सौरभ राजपूत यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या त्यांची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला या दोघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. सुमारे १३ महिने चाललेली सुनावणी, १२७ हून अधिक न्यायालयीन तारखा आणि २२ पेक्षा अधिक साक्षीदारांच्या साक्षीनंतर हा निकाल जाहीर करण्यात आला.
सौरभ राजपूत यांच्या हत्येप्रकरणी मुस्कान आणि साहिल यांना न्यायालयाने यापूर्वीच दोषी ठरवले होते. त्यानंतर आज दोघांच्या शिक्षेबाबत अंतिम निर्णय सुनावण्यात आला. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.शिक्षा सुनावण्यापूर्वी बुधवारी सकाळी दोन्ही दोषींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आले. यावेळी न्यायाधीशांनी त्यांना शिक्षेबाबत काही सांगायचे आहे का, अशी विचारणा केली. मात्र, दोघांनीही आपली बाजू मांडण्यास नकार दिला. त्यानंतर न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा muskan and sahil सुनावली.या प्रकरणाची घटना मार्च २०२५ मध्ये मेरठ येथे घडली होती. सौरभ राजपूत यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांच्यावर ठेवण्यात आला होता. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून ते एका निळ्या ड्रममध्ये ठेवण्यात आले आणि ड्रम सिमेंटने बंद करण्यात आल्याचा आरोप तपासादरम्यान समोर आला होता. या धक्कादायक प्रकारामुळे देशभरात खळबळ उडाली होती.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दीर्घकाळ सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवल्यानंतर न्यायालयाने ३० सप्टेंबर २०२६ रोजी मुस्कान आणि साहिल यांना दोषी ठरवले होते. त्यानंतर आज, १४ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावून या खटल्यातील शिक्षेबाबतचा निर्णय जाहीर केला.