महिला डॉक्टरचा हुंड्यासाठी छळ

पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

    दिनांक :14-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
nagpur dowry harassment case हुंड्याच्या रकमेसाठी पती आणि सासूकडून शारीरिक व मानसिक छळ होत असल्याची तक्रार छत्रपती संभाजीनगर येथील एका महिला दंतचिकित्सकाने नंदनवन पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या पतीसह सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अंकिता (३२) असे तक्रारदार महिलेचे नाव असून, ती दंतचिकित्सक आहे. तिचे छत्रपती संभाजीनगर येथील अनिकेत या तरुणाशी २६ नोव्हेंबर २०२४ रोजी लग्न झाले होते.
 
nagpur dowry harassment case woman dentist files complaint against husband and mother-in-law
 
लग्नानंतर काही दिवसांनीच पती आणि सासूने माहेरून पैसे आणण्यासाठी तिचा छळ सुरू केल्याचा आरोप अंकिताने तक्रारीत केला आहे. माहेरून पैसे आणणे शक्य नसल्याने पती दारू पिऊन वारंवार मारहाण करीत असल्याचे तिने म्हटले आहे. सासूही तिचा मानसिक छळ करीत होती. अंकिता पैसे आणत नसल्यामुळे काही दिवसांपूर्वी तिला माहेरी पाठवून देण्यात आले. आता घटस्फोट देण्यासाठीही तिच्यावर दबाव टाकला जात असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.