राष्ट्र सेविका समितीचा शस्त्रपूजन आणि विजयादशमी उत्सव

    दिनांक :14-Oct-2026
Total Views |
नागपूर
rashtra sevika samiti राष्ट्र सेविका समितीचा शस्त्रपूजन आणि विजयादशमी उत्सव शुक्रावर, दिनांक 16 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडे पाच वाजता महात्मा गांधी सेंटनियल, सिंधू हाय स्कूल, जरीपटका येथे होणार आहे. प्रमुख संचालिका मा. शांताक्का यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती अनुराधा प्रभुदेसाई, संस्थापिका लक्ष फाऊंडेशन, पुणे, या राहणार आहेत.
 

rashtra sevika samiti to celebrate vijayadashami with shastra pujan in jaripatka, nagpur 
 
 
त्यांनी बॅंकेच्या व्यवस्थापकाच्या पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली व त्या लक्ष्य फाऊंडेशन साठी पूर्णवेळ काम करीत आहेत. सामान्य नागरिक आणि सीमेवर लढणारे जवान यांच्यातील अंतर कमी करणे, तरुणांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण करणे आणि सैनिकांच्या कुटुंबियांना आधार देणे यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. अनेक जवानांच्या त्या 'अनुताई', 'आई' किंवा 'अनुमावशी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी 'सैनिक : तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा हे अनुभवकथनही लिहिले आहे.