लाचखोरीप्रकरणी CBIची मोठी कारवाई

म्यूनिशन्स इंडिया लिमिटेडच्या कार्यकारी संचालकासह तिघांना अटक

    दिनांक :15-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली
cbi लाचखोरीच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई करत म्यूनिशन्स इंडिया लिमिटेडचे (MIL) कार्यकारी संचालक अनिल कुमार यांच्यासह तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये खासगी कंपनी एसएमपीपी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि संचालक व प्रवर्तक आशीष कंसल तसेच अनिल कुमार यांचे बंधू बी. हर्षवर्धन यांचा समावेश आहे. सीबीआयने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी ही कारवाई केली.
 

cbi arrests munitions india director anil kumar in bribery case, seizes rs 2.23 crore cash 
या प्रकरणी सीबीआयने १२ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा दाखल केला होता. पुणेस्थित म्यूनिशन्स इंडिया लिमिटेडमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असलेले अनिल कुमार हे काही खासगी कंत्राटदार आणि विक्रेत्यांच्या संगनमताने लाचेची मागणी करणे तसेच ती स्वीकारण्याच्या कथित प्रकारात सहभागी असल्याचा आरोप आहे. त्याबदल्यात संबंधित व्यक्तींना सरकारी कामकाजात अनुचित लाभ मिळवून दिला जात असल्याचा संशय तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान सीबीआयने अनिल कुमार यांच्या पुण्यातील निवासस्थानी आणि अन्य संबंधित ठिकाणी झडती घेतली. पुण्यातील ठिकाणावरून तब्बल १ कोटी ७३ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. याशिवाय म्हैसूर, बंगळुरू आणि दिल्ली येथेही आरोपींशी संबंधित परिसरांची झडती घेण्यात आली. या कारवाईत सुमारे ५० लाख रुपये रोख आणि प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआयकडून सुरू आहे.दरम्यान, पंजाबमधील सरकारी विभागांमधील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणातही सीबीआयने तपासाचा वेग वाढविला आहे. पंजाब सरकारच्या १५ महत्त्वाच्या विभागांमध्ये नियुक्त्या, बदल्या आणि धोरणात्मक निर्णय घेताना अनियमितता किंवा भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांची चौकशी केली जात आहे. या अनुषंगाने संबंधित विभागांकडून गोपनीय फाइल्स, टिपणपत्रे आणि अन्य आवश्यक कागदपत्रे मागविण्यात आली आहेत.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, या तपासाचा अहवाल ४ डिसेंबर २०२६ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी पंजाब सरकारच्या कार्मिक विभागाने १४ ऑक्टोबर रोजी संबंधित सर्व विभागांना आवश्यक अभिलेख उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. गृह, महसूल, आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा आणि स्थानिक स्वराज्य संस्थ