मुंबई,
comedians-harsh-madhur-summonsगेल्या काही महिन्यांपासून बरेच कलाकार वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. आपल्या कॉमेडीमुळे काही कॉमेडियन्सवर कारवाई करण्यात आली होती. समय रैना आपल्या 'इंडियाज गॉट लेटेंट'मुळे वादात अडकला होता. आता दोन कॉमेडियन्सवर कारवाईची टांगती तलवार आहे. प्रसिद्ध कॉमेडियन हर्ष गुजराल आणि कॉमेडियन मधुर विरली आपल्या विनोदामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
आपल्या विनोदात अश्लील आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्यामुळे वादात अडकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सायबरने दोन्ही कॉमेडियन्सला समन्स बजावले आहे. दोन्ही विनोदी कलाकारांना 19 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी सायबर सेलमध्ये बोलवण्यात आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेनं दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे महाराष्ट्र सायबरने तपास सुरु केला आहे.
हर्ष गुजराल आणि मधुर विरली यांच्या आधीही अनेक विनोदी कलाकारांना आपल्या कॉमेडीमुळे कारवाईला सामोरे जावे लागले होते. समय रैनासंदर्भात वाद अधिक चिघळला होता. 'इंडिया गॉट लेटेंट'मुळे समय वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. काही दिवसांपूर्वी प्रणित मोरे देखील '370 रुपयांची बिर्याणी' प्रकरणात पुरता अडकला होता. त्याच्या शोमधील क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली होती.
प्रणित मोरेच्या शोमध्ये उपस्थित असलेल्या ऑडियन्सच्या वक्तव्यामुळे तो अडकला होता. हिमांशु नावाच्या एका युवकाने आपल्या डेट संदर्भात किस्सा शेअर केला होता. त्याने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. जे ऐकून प्रणित मोरेही हसला होता. ज्यामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला होता. प्रणित मोरेला माफी मागावी लागली होती.