मालेगाव तालुयातील ६५ हजार हेटरवरील पिके बाधित

९५ टक्के शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

    दिनांक :15-Oct-2026
Total Views |
मालेगाव,
malegaon-taluka खरीप हंगामात पावसाने पाठ फिरवल्यामुळे मालेगाव तालुयात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तीन सदस्यीय समितीने केलेल्या अंतिम पंचनाम्यानुसार तालुयातील १२७ गावामधील तब्बल ६५,२५० हेटर क्षेत्रावरील पिके पूर्णपणे बाधित झाली असून, यामुळे सुमारे ९५ टक्के शेतकरी संकटात सापडले आहेत. शासनाच्या निकषाप्रमाणे व आदेशानुसार स्थानिक महसूल प्रशासनातर्फे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आल्यानंतर पीक पंचनामेच्या अंतिम अहवाल तयार करण्यात आले आहे.
 
 
malegaon-taluka
 
पीक पंचनामेच्या अंतिम अहवाल तहसील कार्यालयाकडे संबंधित मंडळाधिकार्‍यातर्फे दाखल करण्यात आले असून, सदर अहवाल हा आता वरिष्ठांकडे सादर केल्या जाणार आहे. राज्य सरकारने राज्यातील ३०५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केल्यानंतर, मालेगाव तालुयातही पीक नुकसानीच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली होती. तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या तीन सदस्यीय समितीने संयुक्तपणे हे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. तालुयातील ५९,०४३ खातेदार शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले असून, त्याचा अंतिम अहवाल नुकताच तहसील कार्यालयामार्फत वरिष्ठ प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. या सर्वेक्षणात प्रामुख्याने खरीप आणि फळबागांच्या नुकसानीची नोंद करण्यात आली आहे. मुख्य खरीप पिके (सोयाबीन, तूर, कापूस) ५६,५७० हेटर क्षेत्र बाधित, हळद पीक ६,८८३ हेटर क्षेत्र बाधित, फळबाग पिके १,७९५ हेटर क्षेत्र बाधित झाले आहे.
 
 
राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात अद्याप शेतकर्‍यांच्या बँक खात्यात कोणतीही मदत जमा झालेली नाही. खरीप हंगाम हातातून गेल्यामुळे आणि पुढील रब्बी हंगामासाठी आर्थिक संकट उभे ठाकल्यामुळे, शासनाने तातडीने भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी आर्त हाक मालेगाव तालुयातील शेतकरी देत आहेत. तालुयात जवळपास ९५ टक्के शेतकर्‍यांच्या शेतजमिनी ह्या पावसाअभावी झालेल्या नुकसानीने बाधित झालेले आहे.