वर्धा
devendra fadnavis dlitt सावंगी मेघे येथील दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचा १७ वा दीक्षांत समारंभ शनिवार १७ रोजी दुपारी २ वाजता सावंगी येथील दत्ता मेघे सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारंभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डीलिट पदवीने सन्मानीत करण्यात येणार आहेे. गेल्या १७ वर्षांमध्ये या विद्यापीठाचेच नव्हे तर सावंगीच्या वैद्यकीय चळवळीचे प्रणेते दत्ता मेघे यांच्याशिवाय हा दीक्षांत समारंभ होणार आहे.
१९९० मध्ये रजिस्टर झालेल्या या संस्थेचे १९९० मध्ये जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज सुरू झाले. त्यानंतर विविध वैद्यकीय शाखांचे महाविद्यालयही येथे सुरू झाले. या महाविद्यालयांचा उंचावलेला आलेख आणि दत्ता मेघे यांची महत्त्वाकांक्षेने येथे सन २०२१-२२ मध्ये अभिमत विद्यापीठ म्हणून मान्यता मिळाली. २०२६ मध्ये विद्यापीठासह रुग्णालयही अदानी समुहाला विकल्याची दबया आवाजात सुरुवात झाली. मात्र, गेल्या पंधरवाड्यात अदानी समूहानी अधिकृतरित्या सावंगी येथील कारभार सांभाळल्याचे जाहीर केले. अदानी अधिकृत झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळातील पहिला दीक्षांत समारंभ होतो आहे.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डी. लिट तर एनएमसीचे अध्यक्ष डॉ. अभिजित शेटे यांना डी. एससी या मानद पदवीने सन्मानीत करण्यात येणार आहे. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर. हिंगणा येथील आमदार समीर मेघे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असुन अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या कुलपती डॉ. प्रिती अदानी यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी अदानी समुहाचे डॉ. मलय महादेवी आणि अदानी समुहाचे विश्वस्त सागर मेघे, प्रकुलगुरू डॉ. ललीतभूषण वाघमारे यांची उपस्थिती राहणार आहे.