जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी आरोग्य केंद्राना अचानक भेट

कर्मचार्‍यांना मुख्यालयी उपस्थितीचे कडक निर्देश

    दिनांक :15-Oct-2026
Total Views |
बुलढाणा
district-health-officer जिल्ह्यात नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांनी दि. १५ ऑक्टोबर रोजी आयुष्मान आरोग्य मंदिर, पाडळी आणि उपकेंद्र दहीद बुद्रुक येथे अचानक भेटी दिल्या. या अनौपचारिक भेटीदरम्यान त्यांनी आरोग्य संस्थांतील सर्व सुविधांचे, औषधसाठ्याचे, स्वच्छतेच्या व्यवस्थेचे तसेच विविध अभिलेखांचे काटेकोरपणे परीक्षण केले.

health offiecer 
डॉ. मंडाले यांनी आरोग्य कर्मचार्‍यांना मुख्यालयी नियमित उपस्थित राहण्यास आवाहन करत नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार सेवा देण्यावर विशेष भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा कर्तव्यात कसूर सहन केली जाणार नाही. त्यांनी कर्तव्यात चूक करणार्‍या किंवा विनापरवानगी गैरहजर राहणार्‍या कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई होईल, असेही स्पष्ट इशारा दिला. ग्रामीण भागातील आरोग्य सेवेची गुणवत्ता आणि प्रभावी वितरण यासाठी सतत आरोग्य संस्थांच्या कामकाजावर देखरेख सुरू ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांनी सर्व आरोग्य कर्मचार्‍यांना जबाबदारीने काम करण्याचे आणि आरोग्य व्यवस्थेच्या सेवांना अधिक सक्षम करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.