नवरात्रोत्सवात खाण्यापिण्याचं नो टेन्शन?

FDA च्या धडक कारवाईने भेसळखोरांचे धाबे दणाणले!

    दिनांक :15-Oct-2026
Total Views |
मुंबई,
FDA raid Maharashtraआयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त आणि कालबाह्य अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पुन्हा एकदा कडक कारवाई केली आहे. नवरात्र उत्सवात राज्यभरात निकृष्ट, असुरक्षित आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात FDA ने धडक मोहीम राबवली आहे. या मोहिमेंतर्गत पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई, कोकण आणि छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या आहेत.
 
ffda1
 
 
 
या कारवाईत नेमकं काय घडलं…
– कोकण विभागात 1 लाख 7 हजारांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त
– कारवाईत 4 एफआयआर दाखल, 4 जणांना अटक
– छत्रपती संभाजीनगरमध्ये 39 लाखांहून अधिक किमतीचे 17 हजार 784 किलो खाद्यतेल जप्त
– पुणे, नाशिक, नागपूर आणि मुंबईतही अन्नसाठ्यावर कारवाई
– मिठाई, वेफर्स, चकली, भगर, साबुदाणा, सुपारी आणि कुट्टू आट्याचा समावेश
– मुंबईतील 17 आणि छत्रपती संभाजीनगरमधील 2 अन्न आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित
– मुंबईतील 4 आस्थापनांना 1 लाख 30 हजार रुपयांचा तडजोड दंड