सुधाकर कोहळेंसाठी शिक्षक-प्राध्यापक मैदानात!

नितीन गडकरींच्या उपस्थितीत शिक्षक-प्राध्यापक मेळावा उत्साहात

    दिनांक :15-Oct-2026
Total Views |
नागपूर,
Nagpur Graduate Constituency Electionनागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार सुधाकरराव कोहळे यांच्या प्रचारार्थ नागपूरमधील शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा मंथन तर्फे आयोजित मेळावा केंद्रीय मंत्री माननीय श्री. नितीनजी गडकरी यांच्या उपस्थितीत बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी गडकरी वाडा, महाल येथे आयोजित करण्यात आला.
 
 
kohale
 
यावेळी उपस्थित शिक्षक व प्राध्यापकांशी संवाद साधताना नितीन गडकरी यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.यावेळी मार्गदर्शन करताना नितीन गडकरी म्हणाले की, सत्ता, संघर्ष आणि सौंदर्य या गोष्टी कधीही कायमस्वरूपी टिकत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काम करणे आवश्यक आहे. सुधाकरराव कोहळे यांच्या प्रचारासाठी सर्वांनी ताकदीने आणि परस्पर सहकार्याने काम करावे. यापूर्वी अनेकदा या पदवीधर मतदारसंघात विजय मिळविला असून, यंदाही निवडणुकीच्या प्रक्रियेत प्रत्येकाने जबाबदारीने योगदान द्यावे, असे त्यांनी नमूद केले.
 
मतदान करताना मत अवैध ठरणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असून आपल्या मताची किंमत प्रत्येक मतदाराने ओळखली पाहिजे. केवळ स्वतः मतदान करून न थांबता आपल्या सहकाऱ्यांनाही मतदानासाठी सोबत घेऊन जावे आणि मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही नितीन गडकरी यांनी उपस्थित शिक्षक व प्राध्यापकांना केले.यावेळी मंथन ग्रुपच्या वतीने प्रास्ताविक करताना संयोजक विष्णू चांगदे यांनी मंथन ग्रुपच्या कार्याची माहिती दिली. यापूर्वी ग्रुपच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या विविध यशस्वी कार्यक्रमांचा आढावा त्यांनी उपस्थितांसमोर मांडला.
 
 
तसेच शिक्षक आणि प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांवर नितीन गडकरी यांनी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली मंचावर सुधीर दिवे, संभाजी भोसले, विजय मुनींश्वर,ऍड रमण सेनाड, डॉ. देवेंद्र भोंगाडे, डॉ. राजेश गादेवार, डॉ. सोमदत्त करंजेकर, राजेश कनाटे आणि अविनाश कोकाटे यांची मंचावर उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन डॉ. अभय मुदगल यांनी केले.आभार डॉ देवेंद्र भोंगाडे यांनी मांडले.