वाशीम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करा

गोर सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    दिनांक :15-Oct-2026
Total Views |
मानोरा,
chief-minister वाशीम जिल्ह्यातील सहाही तालुयात अतिशय कमी पाऊस झाल्याने शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. खरीप पिके जळून गेली असून शेतकर्‍यांच्या हातात कवडीही नाही. अशा परिस्थितीत शेतकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल पालकांना मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलणे अशय झाले आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर केलेल्या तालुयातील विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, अशी कळकळीची आणि जनहिताची मागणी गोर सेना, मानोरा तालुका शाखेच्या वतीने मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचेकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले.
 
 
chief-minister
 
यावर्षी वाशीम जिल्ह्यातील मानोरा, मंगरूळनाथ, कारंजा, वाशीम, रिसोड, मालेगाव यासह राज्यातील शेकडो तालुयात अतिशय कमी पाऊस झाला आहे. अनेक शेतमजूर बंजारा समाजातील बांधवांसह इतरही समाजातील शेतकरी व मजूर रोजगारासाठी स्थलांतर करीत आहेत. त्याचा थेट परिणाम शिक्षणावर होत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल पालक आपल्या मुला-मुलींचे शिक्षण, परीक्षा फी, प्रयोगशाळा फी, ग्रंथालय फी, क्रीडा फी, वसतिगृह फी, प्रवेश फी, टी.सी. फी भरण्यास असमर्थ आहेत. विशेषतः १० वी, १२ वी, पदवी, आयटीआय, डीएड बीएड,पॉलिटेनिक, उच्च शिक्षण घेणार्‍या अनुसूचित जाती जमाती भटया विमुक्त समाधी व इतर मागासवर्ग आणि अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांवर गळतीची वेळ आली आहे.
 
 
तालुयातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित व खाजगी शाळा, महाविद्यालये, आयटीआय, पॉलिटेनिक, अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालय विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सन २०२५-२६ चे संपूर्ण परीक्षा शुल्क, प्रवेश शुल्क, वसतिगृह शुल्क व इतर आनुषंगिक फी विशेष बाब म्हणून माफ करण्यात यावी. ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरच फी भरली आहे, त्यांना ती फी परत करण्यात यावी किंवा पुढील वर्षात समायोजित करण्यात यावी. वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थ्यांचे भोजन व निवास शुल्क माफ करून त्यांना मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात यावी. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हाधिकारी, व समाज कल्याण विभागाला तातडीने परिपत्रक काढण्याचे आदेश द्यावेत.
 
 
आपण जर याचा शीघ्र निर्णय न घेतल्यास गोर सेना स्टाईलने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी._ असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर तालुका अध्यक्ष सुनील राठोड, जिल्हा उपाध्यक्ष गोपाल चव्हाण, रामराव चव्हाण, डॉ. सुधाकर राठोड, जिल्हा सचिव अरविंद चव्हाण यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.