अभिनेता इमरान खान यांना भारत सोडण्याची नोटीस

२८ ऑक्टोबरपर्यंत मुदत

    दिनांक :15-Oct-2026
Total Views |
मुंबई
imran khan बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान यांचे भाचे आणि अभिनेता इमरान खान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईतील क्रांती मैदानावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झाल्याने मुंबई पोलिसांनी इमरान खान यांना भारत सोडण्याची नोटीस बजावली आहे. २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे निर्देश या नोटिशीद्वारे देण्यात आल्याची माहिती आहे.
 

imran khan served notice to leave india by october 28 after mumbai protest 
इमरान खान यांच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे. ते भारतीय नागरिक नसतानाही मुंबईतील आंदोलनात सहभागी झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर इमिग्रेशन कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार पोलिसांनी त्यांच्याविरोधात ही कारवाई केली आहे.
क्रांती मैदानावरील आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे इमरान खान यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. पोलिसांनी बजावलेल्या नोटिशीची प्रत अभिनेत्याने स्वीकारली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय घडते, याकडे लक्ष लागले आहे.