कामठी, (नागपूर )
Kamathi Polytechnic College कामठी पॉलीटेक्निकच्या मायनिंग अँड माइन सर्व्हेइंग विभागातर्फे स्टुडंट्स असोसिएशन ऑफ मायनिंग इंजिनिअरिंग (SAME) या विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन उत्साहात झाले. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे जनरल मॅनेजर राजेश कुमार सिंग चौहान आणि रॉकटेक इंजिनिअरिंगचे संचालक डॉ. मनोज दामोदर गुरहारिकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य एम. बी. घोळसे अध्यक्षस्थानी होते.
विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक ज्ञान, नेतृत्वगुण आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यासाठी या परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. याअंतर्गत तांत्रिक प्रश्नमंजुषा, पोस्टर व प्रकल्प स्पर्धांसह विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विभागप्रमुख प्रा. रवींद्र साधू यांनी मान्यवरांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला. कलश व पारूळ यांनी सूत्रसंचालन केले.
सौजन्य:रवींद्र साधू ,संपर्क मित्र