कशाचा कायदा, कुणाचा धाक, गावागावात लेझरचा प्रकाश!

आता लोकांनीच सुधारणा करण्याची गरज

    दिनांक :15-Oct-2026
Total Views |
प्रशासन ठरले हतबल
नागपूर,
laser light pollution आपल्या भागात ध्वनीप्रदूषण होऊ नये असेच सर्वांना वाटते. अनेकजण त्याकरिता जीवापाड मेहनतही घेतात अन् कायद्यानुसार वागतात. पण काही मंडळी मात्र जाणीवपूर्वक उत्सवाच्या नावाखाली जो काही गोंधळ घालत आहेत तो प्रकार आता सर्वांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. डीजे वाजवू नका, लेझरचा प्रकाश टाळा असे प्रशासनातर्फे वारंवार आवाहन केले जात आहे. पण कशाचा कायदा, कुणाचा धाक, गावागावात लेझरचा प्रकाश अशीच सत्य स्थिती पहायला मिळत आहे. असाच प्रकार सुरू राहिला तर ध्वनीप्रदूषण, वायूप्रदूषण, जल प्रदूषण या समस्या कधीच संपणार नाहीत. त्या वाढतच जातील अन् पृथ्वीतलावरील मनुष्याचे जीवनच संपवून टाकतील, अशीही भीती समाजभान जपणार्यांनी व्यक्त केली आहे.
 

laser light pollution during festivals in nagpur, police administration helpless 
 
 
ग्रामीण भागात उत्सव आनंदाने साजरा करता यावा म्हणून पोलिस प्रशासनाने जनजागृतीवर भर दिला होता. त्यानुसार नवरात्रापूर्वी प्रत्येक पोलिस स्टेशन मार्फत बैठका घेण्यात आल्या. त्यात डीजे वाजवू नका, लेझर व्यवस्था हटवा, पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या अशा प्रकारे सांगण्यात आले. बैठकांमध्ये सहभागी लोकांनी त्याला होकारच दिला. पण प्रत्यक्षात जेव्हा मंगळवार १३ ऑक्टोबर २०२६ रोजी पारशिवनी, पांजरा, कोराडी, खापरखेडा आणि इतर गावांमध्ये पाहिले असता तिथे लेझरचा प्रकाशच दिसत होता.
याचा अर्थ पोलिस laser light pollution यंत्रणा व्यवस्था बदलविण्यासाठी पुढाकार घेत असताना लोकच जाणीवपूर्वक लेझर लाईट प्रकाशमय करून इतरांचे डोळे खराब करण्यासाठी तत्पर आहे की काय अशीही भीती व्यक्त होत आहे. लेझर लाईटमुळे डोळे खराब होतात. अचानक लेझरचा प्रकाश डोळ्यावर येताच अंधारी पसरते आणि अपघातही घडतात. यावर आळा घालायचा झाल्यास गावासह शहरातूनही लेझर लाईटवर पूर्णत: बंदी येणे काळाची गरज आहे. पण अनेकजण लेझर लाईट लावूनच उत्सव साजरा करण्यावर भर देत असताना रस्त्याने जाणार्यांचे डोळेच धोक्यात आले आहेत.
दरम्यान, ढोलताशांचा आवाजही काही सुमधूर नसतो. यामुळे ध्वनीप्रदूषण होतेच ना, त्याचाही विचार करून शांतता राखत उत्सव साजरा कसा करायचा यासंदर्भात उपक्रम हाती घेणे गरजेचे झाले आहे.