चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीचे लैंगिक शोषण

भाडेकरूला अटक, तीन दिवसांची पोलीस कोठडी

    दिनांक :15-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर


nagpur crime चॉकलेटचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून पाचपावली पोलिसांनी ४७ वर्षीय भाडेकरूला अटक केली आहे. पीडितेने शाळेतील शिक्षिकेला आपबिती सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
 

nagpur crime tenant arrested for sexually abusing minor girl with chocolate lure 
राजेश पापालाल कनोजिया असे आरोपीचे नाव आहे. तो तक्रारदाराच्या घरी भाड्याने राहत होता. आरोपीने अयोग्य स्पर्श केल्याचे मुलीने शिक्षिकेला सांगितले. शिक्षिकेने तिच्या पालकांना शाळेत बोलावून माहिती दिली. पालकांनी विश्वासात घेऊन विचारल्यानंतर आरोपी चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करीत असल्याचे मुलीने सांगितल्याचा आरोप आहे. याबाबत कोणाला सांगितल्यास वडिलांना जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली होती. मुलगी रडू लागल्यास तो तिचे तोंड दाबत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी  nagpur crime  पाचपावली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(के), ६५(२) आणि ३५१(२) तसेच पॉक्सो कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.