शिक्षकाकडून १४ वर्षीय मुलीचा विनयभंग

घरात घुसून गैरवर्तन केल्याचा आरोप वाठोडा पोलिसांत गुन्हा nagpur

    दिनांक :15-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर
nagpur शिकवणीसाठी घरी येणाऱ्या शिक्षकाने १४ वर्षीय मुलगी झोपेत असताना तिच्याशी गैरवर्तन केल्याचा प्रकार वाठोडा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सचिन वंजारी (वय ३० वर्षे) याच्याविरुद्ध वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 

nagpur crime tenant arrested for sexually abusing minor girl with chocolate lure 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तक्रारदाराच्या घरी त्यांच्या नऊ वर्षीय मुलाला शिकवण्यासाठी नियमित येत होता. १२ ऑक्टोबर रोजी मुलीची आई नातेवाइकाकडे गेली असताना मुलगी आणि तिचा लहान भाऊ घरात झोपले होते. यावेळी आरोपी घरी आला आणि मुलगी झोपेत असताना तिच्याशी अयोग्य स्पर्श केल्याचा आरोप आहे. त्यामुळे मुलीला जाग आली. मुलीने आरोपीला त्याच्या वर्तनाबाबत जाब विचारताच तो घरातून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितला. आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे वाठोडा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) संबंधित कलमांसह पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. आरोपीची यापूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी उपलब्ध नसल्याची पोलिसांची नोंद असून, पुढील तपास सुरू आहे.