कन्यापूजनासोबत सामाजिक बांधिलकीचा जागर

    दिनांक :15-Oct-2026
Total Views |
नागपूर :
Navaratri Festival 2026 नवरात्रोत्सवानिमित्त बँक ऑफ इंडियाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांतर्फे हनुमाननगर येथील मातृशक्ती कल्याण केंद्राच्या मुलींच्या छात्रावासात १३ ऑक्टोबर रोजी कन्यापूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी छात्रावासासाठी २३ हजार रुपयांचा धनादेश ज्येष्ठ सभासद विनायकराव जोशी यांच्या हस्ते संचालिका रेखा वानखेडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
 
mnh
 
 
कार्यक्रमाच्या प्रारंभी संयोजक संजय विठ्ठलराव पत्की यांनी प्रास्ताविक करून निमंत्रितांचा परिचय करून दिला. सभासदांच्या पत्नींनी छात्रावासातील कुमारिकांचे पूजन केले. त्यानंतर सीमा सतीश मुन्शी यांनी नागपूर, विदर्भ, महाराष्ट्र आणि भारतावर आधारित प्रश्नमंजुषा घेतली. मिलिंद केकरे यांनी जुन्या लग्नपत्रिकांपासून पक्ष्यांसाठी घरटी तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.विजय गाडगीळ यांनी आभार मानले. उपस्थितांनी सामूहिक वंदे मातरम् गायन केले. त्यानंतर सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सौजन्य: महेश मोळकर,संपर्क मित्र